Raju Shetti  esakal
कोल्हापूर

'FRP'चे तुकडे केल्यास राज्यातील ऊस उत्पादक संकटात येणार'

सकाळ वृत्तसेवा

शेतकऱ्यांचे सरकार म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातील पक्षही एकरकमी एफआरपी बाबत मौन बाळगून आहेत.

कोल्हापूर : केंद्राने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत राज्यांकडून म्हणणे मागवले आहे, पण त्याला महाराष्ट्रने विरोध केला नाही. याचा अर्थ राज्य सरकार ही एफआरपीचे तुकडे करण्याला संमती दाखवत आहे. हे स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही खपवून घेणार नाही. एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने 12 ते 30 सप्टेंबर या कालावधीत मिसकॉल मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी असे वाटत असेल, त्यांनी या क्रमांकावर मिस कॉल करावेत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (8) पत्रकार परिषदेत केले

यावेळी शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारच्या वतीने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत म्हणणे मागवण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनेही याला विरोध केला नाही. शेतकऱ्यांचे सरकार म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातील पक्षही एकरकमी एफआरपी बाबत मौन बाळगून आहेत. एफआरपीचे तुकडे केल्यास राज्यभरातील ऊस उत्पादक संकटात येणार आहेत. एफआरपीच्या तुकड्याच्या विरोधात आम्ही लढा उभारणार आहोत.

यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या कालावधीत मोहिमेमध्ये भाग घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले. 12 तारखेपासून 8448183751 या क्रमांकावर शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावेत असे आवाहन शेट्टी यांनी केले. यावेळी जालिंदर पाटील यांच्यासह स्वाभिमानाचे पदाधीकारी उपस्थित होते.

एफआरपीचे तुकडे पडल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1680 रुपयांचा पहिला हप्ता मिळेल. तर 560 रुपयांचे उर्वरित दोन हप्ते तुकड्याने मिळतील. या सूत्राप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांनाही रक्कम मिळेल. त्यामुळे ऊस उत्पादक मोठ्या संकटात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT