Pachgaon Gram Panchayat esakal
कोल्हापूर

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री घरावर दगड पडत असल्याने भीतीचे वातावरण; तरूणांकडून गस्त सुरू

परिसरामध्ये आठ दिवसांपासून घरावर दगड पडण्याचे प्रकार सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण टेरेसवर झोपतात. आशा प्रकाराने दगड लागून नागरिक जखमी होण्याचीही शक्यता आहे.

कंदलगाव : पाचगाव ग्रामपंचायतीच्या (Pachgaon Gram Panchayat) हद्दीतील मगदूम कॉलनी इथं आठ दिवसांपासून मध्यरात्री दोन ते साडेतीनच्या दरम्यान घराच्या छतावर मोठे दगड पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण टेरेसवर झोपतात. आशा प्रकाराने दगड लागून नागरिक जखमी होण्याचीही शक्यता आहे. ज्यावेळी दगड पडतात त्यावेळी घराबाहेर पडणे भीतीदायक असल्याने अज्ञात व्यक्ती हा डाव साधून गायब होत असल्यानं स्थानिकांना त्याचा पत्ता लागत नाही. पोलिसांनी (Police) परिसरात गस्त वाढविण्याची गरज आहे.

मगदूम कॉलनी हा दाट वस्तीचा परिसर असून, पश्चिमेला माळरान असल्याचा फायदा घेऊन अज्ञातांकडून असे प्रकार घडत आहेत. छतावर दगड, वीटा आणि फरशीही पडत आहे.

-सागर वठारकर, स्थानिक

या परिसरामध्ये आठ दिवसांपासून घरावर दगड पडण्याचे प्रकार सुरू आहेत. स्थानिक तरुणांकडून गस्त सुरु आहे. परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन परिसरात गस्त घालावी.

-विकी काटकर, करवीर तालुका उपप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT