Strong laws on womens safety Be fearless
Strong laws on womens safety Be fearless  sakal
कोल्हापूर

महिला सुरक्षिततेबाबत कायदे भक्कम ; निर्भय व्हा; निडर बना!

राजेश मोरे

कोल्हापूर : त्रास देणाऱ्यांविरोधात तरुणींनी आणि महिलांनी निर्भया व निडर बनण्याची गरज आहे. अडचण काहीही असून दे, पालकांशी बोला, पोलिसांशी वेळीच संपर्क साधा. कायदे कडक आहेत. तुम्हाला आवश्यक ती मदत मिळून त्रास देणाऱ्याच्या वेळीच मुसक्या आवळता येतील; पण घाबरून तुम्ही तुमचे आयुष्य संपवले तर संशयित आरोपी अधिकच बेदरकार होईल.

काल जिल्ह्यात तरुणांच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणींनी आयुष्य संपवल्याच्या घटना समोर आल्या. जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रकार घडतात. छेडछाड, पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी गुन्हेही पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत. तरुणांच्या त्रासाला कंटाळून जिल्ह्यातील दोन तरुणींनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करून आपली जीवनयात्राच संपवल्याची घटना घडल्याने हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा पोलिस दलानेही काही वर्षांत विविध उपाययोजना केल्या आहेत. निर्भया पथक, हेल्पलाईन क्रमांक, महिला तक्रार निवारण कक्ष आदींचा त्यात सहभाग आहे. शाळा महाविद्यालय परिसरासह गर्दीच्या आणि निर्जनस्थळी निर्भया पथकांकडून टवाळखोरांवर ‘वॉच’ ठेवला जातो.

छेडछाड अगर त्रास देण्याचे प्रकार मुली पालकांना सांगणे टाळतात. तुझीच काय तरी चूक असेल, असा उलट सवाल होऊन शाळा, कॉलेज बंद केले जाईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. दुसरीकडे पोलिस ठाण्यात कसे जायचे? तक्रार कोणाकडे, कशी करायची? केली तर आपले नाव पुढे येईल का? अशी धास्तीही असते. त्यामुळे पीडिता अन्याय सहन करते. परिणामी, त्रास देणाऱ्या घटकाचे धाडस वाढते. अखेर हा त्रास सहन न झाल्याने त्यांच्याकडून टोकाचे निर्णय घेतले जाण्याचे धोके वाढतात. ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुलींनी पालकांशी वेळीच बोलावे. पालकांनीही मुलींच्या भावना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे. महिला आत्याचाराविरोधातील कायदे कडक आहेत. वेळीच पोलिसांशी अगर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

कायद्याची माहिती द्या...

शाळा, महाविद्यालयात निर्भया पथकाकडून विद्यार्थिंनीचे समुपदेशन केले जात होते. कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने त्यात व्यत्यय आला. प्रबोधनाची ही मोहीम पुन्हा सुरू करावी आणि त्यातून विद्यार्थिंनी, महिला यांना सुरक्षितता कायद्याचीही माहिती दिली जावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

महिला सुरक्षिततेबाबत उपाययोजना...

  • टोल फ्री क्रमांक १०९१

  • जिल्ह्यात सहा निर्भया पथके

  • अधीक्षक कार्यालयात

  • महिला तक्रार निवारण कक्ष

पालकांनी आपल्या मुलींच्या भावना समजून घ्याव्यात. त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून द्यावी. पालक म्हणून कायम पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्‍वास त्यांना निर्माण करून द्यावा.

- गीता हासूरकर, सामाजिक कार्यकर्त्या.

छेडछाड अगर कोणी त्रास देत असेल तर विद्यार्थिंनीसह महिलांनी थेट निर्भया पथकाशी संपर्क साधावा. फोन अगर निनावी तक्रारींचीही वेळीच दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

- सुनीता शेळके, पोलिस उपनिरीक्षक, निर्भया पथक प्रमुख.

जिल्ह्यात महिला अत्याचाराचे दाखल गुन्हे

प्रकार २०१९ २०२० २०२१

दाखल गुन्हे उघड गुन्हे दाखल गुन्हे उघड गुन्हे दाखल गुन्हे उघड गुन्हे

विनयभंग २०५ २०४ २७२ २७१ ३१६ ३१४

बलात्कार ११४ ११४ ११४ ११४ १६२ १६०

नवविवाहिता आत्महत्या ७ ७ ५ ५ ६ ६

मुली पळवून नेणे २४१ १८३ १२६ ११३ १९८ १४४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT