students appearing for the matriculation examination will have to strictly follow the instructions given by the education department
बेळगाव - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावेळी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याने घालुन दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पेपरला सुरुवात होण्यापुर्वी दिड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागणार असुन परीक्षा काळात कोणत्या गोष्डींकडे लक्ष द्यावे यासाठी परीवेक्षकांकडुन सुचना देण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यावेळी शिक्षण खात्याने उपाय योजना हाती घेतल्या आहेत मात्र शिक्षण खात्याने केलेल्या सुचनांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्य परीवेक्षक व परीवेक्षक यांना सजग रहावे लागणार असुन दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे अशावेळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी पुढील सुचनांकडे लक्ष देणे आवश्यक
- 1. परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे
- 2. घरातुन येताना विद्यार्थ्यांनी नाष्टा किंवा जेवन करुन यावा तसेच नाष्टा न केल्यास परीक्षा केंद्रावर येऊन डबा घेऊन येण्यास मुभा आहे मात्र डबा एकट्यानेच खावा इतरांना डब्यातील पदार्थ देऊ नये
- 3. पालकांनी आपल्या मुलांना प्रवेशव्दारावर सोडावे, पालकांना परीक्षा केंद्रावर पुर्णपणे बंदी असेल
- 4. परीक्षेच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी कंपास, पॅड, हॉल तिकीट, पाण्याची बाटली, मास्क याची तयारी करुन ठेवावी
- 5. परीक्षा केंद्रावर येताना किंवा जाताना विद्यार्थ्यांनी ग्रुप करुन जाऊ नये, प्रत्येकाने सामाजिक अंतर राखावे
- 6. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सॅनिटायजर्स करुन घ्यावे त्यानंतर विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल
- 7. विद्यार्थ्यांचे क्रमांक प्रवेश पत्र क्रमांकाप्रमाणे घातले जातील त्याची पाहणी करुन विद्यार्थ्यांनी आपल्या डेस्कवर बसावे, इतर ठिकाणी बसु नये
- 8. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एकमेकांना कोणतीही वस्तु देऊ नये स्वत: ची वस्तु वापरावी व पेपर झाल्यानंतर कोणतीही वस्तु केंद्रावर ठेऊ नये
- 9. पेपर संपल्यानंतर घरी पोहचे तो पर्यंत विद्यार्थ्याने मास्क काढु नये
- 10. उत्तर पत्रिका वितरीत केल्यानंतर प्रवेश पत्रावरील क्रमांक योग्य पध्दतीने लिहावा एकाद्या वेळी चुक झाल्यास किंवा खाडाखोड झाल्यास परीवेक्षकांची सही घेऊन क्रमांक लिहावा
- 11. सकाळी 10. 30 वाजता प्रश्न पत्रिकांचे वाटप केले जाईल त्यानंतर विद्यार्थ्यांनी 15 मिनिटे प्रश्न पत्रिका वाचुन घ्यावी
- 12. पेपरची वेळ संपण्या अगोदर अतिरीक्त उत्तर पत्रिका हवी असल्यास अर्धा तास अगोदर उत्तर पत्रिका मागुन घ्यावी
- 13. पेपरची वेळ संपण्यापुर्वी 5 मिनिट अगोदर लिहीलेल्या उत्तर पत्रिकांची संख्या चौकटीत नमुद करावी
- 14. उत्तर पत्रिका परीवेक्षकांकडे सुपुर्द केल्यानंतर बाहेर जाताना विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर पाळावे तसेच पेपर संपल्यानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर येऊ नये
- 15. परीक्षेला विद्यार्थ्यांनी धैर्याने सामोरे जावे
शिक्षण खाते दहावी परीक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेत आहे पण विद्यार्थ्यांनीही शिक्षण खात्याने दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षेबाबत परीवेक्षकांना सुचना केल्या जात आहे.
ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.