students invitation a new technology in ichalkaranji DKTE college it's useful for farmers in farm 
कोल्हापूर

आता बळीराजा सुखावणार, मातीतला ओलावा त्याला मोबाइलवर समजणार

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन मधील वैभव सूर्यवंशी, वैभव बाडकर व यश बाहेती या विद्यार्थ्यांनी वायरलेस, आय. ओ. टी. इमेज प्रोसेसिंग व स्पायडर कॅम कार्यप्रणालीचा वापर करून ‘डाटा ड्रीवन ॲग्रीकल्चर युजींग ऐंबेडेड सिस्टीम, आय.ओ.टी. ॲन्ड इमेज प्रोसेसिंग’ असा डिजिटल प्रकल्प बनवला आहे.

या डिजिटल प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांचा फायदा होणे असून आज शेतकऱ्यांना प्रामुख्याने शेतातील शेती मालाची चोरी, गंजी व शेती पेटवणे, पाळीव व वन्य प्राण्यांमुळे पिकांची नासधुस होणे, पिकांवर होणारी किडीचा प्रादुर्भाव, क्षारीमुळे माती तसेच पिकांच्या वाढीवर परीणाम, अनियमित पाणी व अभाव, दुष्काळ आदीमुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे पीक हातातोंडातून जात आहे. याचा अभ्यास करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांस त्याच्या शेताचे जगात कोठूनही देखरेख करता येईल व आपल्या शेतातील पिकांचा डाटा मोबाईलवर तत्काळ दिसेल असे डिजीटल प्रकल्प बनविला आहे.

प्रकल्पात शेतामध्ये कोठे कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे तसेच कोणत्या प्रकारचा रोग पिकांना होत आहे हे अचुक कळते. पिकांची शेतामधील होणारी वाढ ही प्रत्यक्ष व प्रत्येक ठिकाणी जावून पाहणे शेतकऱ्यास शक्‍य नसते. स्पायडर कॅम तंत्रज्ञानामुळे हे शक्‍य झाले आहे की जो वायरलेस कार्यप्रणालीद्वारे पूर्ण शेतातील पिकांचे फोटो शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवत असतो. शेतातील मातीचा ओलावा, पी.एच., हवेतील उष्णता या घटकांसाठी प्रकल्पामध्ये सेन्सर वापरलेले आहेत व या सर्व घटकांची माहितीही शेतकऱ्यांना मोबाइलवर पाहता येणार आहे.

प्रकल्पास भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रकल्पास लीड कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अर्थसहाय्य लाभले. प्रा. व्ही. बी. सुतार यांचे प्रकल्प पुर्णत्वासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. संस्थेचे डायरेक्‍टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्‍टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे व ईटीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT