success story to Sweater Professional 
कोल्हापूर

संघर्ष तिच्या पाचवीला पुजलेलाच; पण स्वेटरच्या दुनियेतून घेतली फिनिक्‍स भरारी 

आकाश खांडके

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) : जन्मजात अपंगत्व व्यक्तीला आयुष्यभरासाठी निराश करते पण, त्यातूनही मार्ग काढत स्वत:च्या पायावर उभा राहणाऱ्या व्यक्ती प्रेरणास्थान ठरतात. 
अयोध्या पार्कमध्ये राहणाऱ्या मिनाक्षी आप्पासाहेब पाटील यांनी पायाच्या व्याधीला यशाच्या मार्गावरील अडथळा होऊ दिला नाही. रिसेप्शनिस्ट ते यशस्वी उद्योजिका हा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. रोजगार निर्मिती करुन 12 कुटुंबांना त्यांनी आधार दिला आहे. 

मिनाक्षी पाटील यांना menigoyelocil आजार आहे. त्यांच्या पायांना संवेदना जाणवत नाहीत. पाय लुळे पडतात. या आजराबरोबर त्यांना अनेक अडचणी येतात. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी पदवी मिळवली. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी दवाखान्यात रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारली. त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. सगळे सुरळीत सुरू असताना नियतीने अजून एक घात घातला. दवाखान्याबाहेर त्या पाय घसरून पडल्या आणि चालण्याचा प्रयत्नही थांबला. पदवी शिक्षण झालेले, नोकरीची इच्छा होती. पण, व्हीलचेअरने धरलेली पाठ सुटणे शक्‍य नव्हते. 

चार भिंतींत राहून काय करता येईल, हा शोध सुरू असतानाच त्यांना लोकरकामाच्या कार्यशाळेबद्दल माहिती मिळाली. त्या व त्यांच्या काकी त्यात सहभागी झाल्या. सरावासाठी केलेले स्वेटर विक्री झाले. त्यांनी आई-वडिलांना मशीन घेण्यासाठी तयार केले. मशीन घेतल्यावर काकींच्या मदतीने किरकोळ काम सुरू झाले. घरकाम करणाऱ्या सुमनने त्यांना साथ दिली. कार्यशाळेनंतर या व्यवसायात उतरलेल्या बहुतांश व्यक्तींनी काढता पाय घेतला. पण त्यांनी संयमाने काम सुरू ठेवले. शेजारच्या कुटुंबाकडून 45 शालची ऑर्डर मिळाली. त्यानंतर होलसेल ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. 

स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा कांचन परुळेकर यांनी काम बघून प्रदर्शनात सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले. एकदम 400 स्वेटरची ऑर्डर मिळाली. व्याप वाढला म्हणून अजून एक मशीन घेतले व एका महिलेला कामावर रुजू केले. एक दोन स्वेटरपासून सुरू केलेले काम पाचशे, हजारच्या घरात पोचले. सध्या पंधरा महिला कामावर रुजू आहेत. 

आई-वडिलांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी आज इथेपर्यंत पोचले आहे. सुमन जाधव हिचा सुद्धा माझ्या यशात वाटा आहे. 
- मिनाक्षी अप्पासाहेब पाटील. 

गणेशमूर्ती संग्रहाचा छंद 
मिनाक्षी यांना विविध प्रकारच्या गणेश मूर्ती संग्रह करण्याचा छंद आहे. 100 हून अधिक मूर्ती त्यांनी संग्रहित केल्या आहेत. याच बरोबर त्यांना वाचनाचीही आवड आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळमध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडी; अध्यक्ष निवडीआधी संचालकांना घरातून उचललं; सतेज पाटलांचे १३ संचालक सहलीवर, महायुतीचे संचालक गोव्याला जाणार?

Jobs For Agniveer: अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! परीक्षेविना थेट नोकरी, २५० हून अधिक जणांना नियुक्तीपत्रे

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची माधुरी दीक्षितलाही भुरळ; नम्रता संभेरावसमोर म्हटला लॉलीचा तो फेमस डायलॉग, सगळे पाहताच राहिले

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना प्रिय असते प्रायव्हसी,स्वत:ची स्पेस! पार्टनरसोबत असूनही एकटे राहणे का आवडते?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये सीएनजी दरात अचानक 5 रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT