Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur : दहावीच्या अभ्यासाचं टेन्शन, विद्यार्थिनीनं शाळेच्या पहिल्याच दिवशी उचललं टोकाचं पाऊल..

विद्यार्थिनीने बाथरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

बराच वेळ ती बाहेर न आल्याने वडिलांनी बाहेरुन हाक मारली असता श्रुतीने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी दरवाजा तोडून बाथरूममध्ये प्रवेश केला.

सांगरुळ : पाचकटेवाडी (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीने बाथरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रुती मारुती सुतार (वय १५) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत (Karveer Police) झाली.

श्रुती सुतार ही बोलोली येथील स्वयंभू हायस्कूलमध्ये (Swayambhu High School) शिक्षण घेत होती. ती दहावीच्या वर्गात जाणार होती. तिने सुरुवातीपासूनच दहावीच्या अभ्यासाचे टेन्शन घेतले होते. तिच्या वडिलांनी तिला अभ्यासाचे टेन्शन घेऊ नको असे वारंवार सांगितले होते.

दरम्यान, काल शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेला जाण्याची तयारी करत होती. श्रुती आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. बराच वेळ ती बाहेर न आल्याने वडिलांनी बाहेरुन हाक मारली असता तिने प्रतिसाद न दिल्याने वडिलांनी दरवाजा तोडून बाथरूममध्ये प्रवेश केला.

त्यावेळी तिने साडीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले तिला कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT