Belgaum Crime News esakal
कोल्हापूर

Belgaum : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणानं नायलॉनच्या दोरीनं घेतला गळफास; का उचललं टोकाचं पाऊल?

महिनाभरापूर्वी लग्न (Marriage) झालेल्या नवविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

वर्षभरापूर्वी प्रतीक हा सायकलवरून पडला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याला आणि पायाला मार लागला होता.

बेळगाव : महिनाभरापूर्वी लग्न (Marriage) झालेल्या नवविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवार (ता. २२) रात्री ९ च्या दरम्यान दुर्गा कॉलनी गणेशपूर येथे ही घटना घडली असून, प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय २९) असे त्याचे नाव आहे.

घटनेची नोंद काकती पोलिस (Kakati Police) स्थानकात झाली आहे. पोलिसांतून समजलेली माहिती अशी, वर्षभरापूर्वी प्रतीक हा सायकलवरून पडला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याला आणि पायाला मार लागला होता. तेंव्हापासून त्याला आराम वाटत नसे.

याच कारणातून काल रात्री ९ च्या दरम्यान घरच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन नायलॉन दोरीने गळफास घेतला. काही वेळानंतर त्याला कुटुंबीयांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान रात्री १०.२० च्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महिनाभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT