Crime News Esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : चाचणी परीक्षेचं टेन्शन? शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

आर्यनची सध्या चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता.

सकाळ डिजिटल टीम

आर्यनने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले.

कोल्हापूर : टाकाळा येथील माळी कॉलनीत शाळकरी मुलाने (School Boy) काल गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्यन देवीदास पालवे (वय १५, सध्या रा. टाकाळा, कोल्हापूर, मूळ रा. एसएनडीटी कॉलेजसमोर, पुणे) असे त्याचे नाव आहे.

याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. अभ्यासाच्या तणावातून की अन्य कारणातून आत्महत्या केली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती राजारामपुरी पोलिस (Rajarampuri Police) ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, आर्यनची सध्या चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता. काल (सोमवार) दुपारी त्याची आई घरी आल्यानंतर आर्यन त्याच्या बेडरुममध्ये होता. त्याला हाक दिल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आईने त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.

तेव्हा आर्यनने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आर्यनचे वडील बँकेत अधिकारी आहेत, तर आई शिक्षिका आहे. तो इयत्ता नववीत शिकत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT