Kolhapur Crime News
Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : धक्कादायक! मुलगा होत नसल्याने सासरच्या नातेवाईकांकडून छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू, सासऱ्याकडून सतत तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता.

सोनाळी : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांकडून सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कोथळी (ता. करवीर) येथे रविवारी रात्री उशिरा घडला.

सौ. अस्मिता केदारी चौगले (वय ३०) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी (Karveer Police) पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले, सासरे गणपती गुंडू चौगले (रा. सर्व कोथळी) यांच्यावर गुन्हा दाखल करत या सर्वांना अटक केली आहे.

मृत अस्मिता हिचे वडील दगडू सदाशिव यादव (५५, रा. केकतवाडी, पो. शिरोली दुमाला, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले, की अस्मिता आणि केदारी यांचा विवाह तेरा वर्षांपूर्वी झाला होता. केदारी शेती करतो. अस्मिता गृहिणी होती. या दाम्पत्याला नऊ व आठ वर्षांची दोन मुली आहेत.

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू, सासऱ्याकडून सतत तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता. सततच्या त्रासाला कंटाळून तिने रविवारी रात्री घरात पंख्याला साडीने गळफास घेतला. हा प्रकार पतीच्या लक्षात येताच त्याने गळफास सोडवून तिला सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी अस्मिता हिच्या माहेरी नातेवाईकांनी अस्मिताच्या पती, सासू आणि सासऱ्यास अटक करा, अशी मागणी केली. त्यावेळी तेथे काही काळ तणाव होता. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक इनामदार तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP : अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी; राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी केलं तिहार कारागृहात आत्‍मसमर्पण; म्हणाले, 'मी या हुकूमशाहीविरुद्ध...'

Gautam Gambhir: 'मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...', अखेर गंभीरने मौन स्पष्टच सांगितलं

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी बँकॉकला जाणार? बोर्डिंग पासचा व्हायरल झालेला फोटो 'Edited'

SCROLL FOR NEXT