parking
parking sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जागा मिळेल तेथे पार्किंग, अशी शहरात परिस्थिती आहे. वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराचा मुख्य भाग असो वा उपनगराचा परिसर रस्त्यावर हमखास उभी असलेली वाहने सर्रास पाहावयास मिळतात. अनेक मिळकतींना पार्किंगची सुविधाच नाही. परिणामी, येथील वाहने थेट रस्त्यावरच पार्किंग केली जातात. मुख्य भागातच बाजार पेठ, व्यापार पेठ, बँका, विविध संस्था आणि शासकीय कार्यालये आहेत. येथे दिवसभर नागरिकांची गर्दी असते. त्यांच्यासमोर वाहने कोठे पार्किंग करायची हा दिव्य प्रश्न असतो. त्यामुळे नागरिकांना मिळेल त्या जागी वाहने पार्किंग करण्याशिवाय गत्यंतर नसते. बेशिस्त पार्किंग अंतर्गत त्यांची गाडी वाहतूक शाखेच्या क्रेनच्या अगर जामरच्या तावडीत सापडते.

शहरात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बिंदू चौकातील पार्किंग लवकर हाऊसफुल्ल होते. दसरा चौक मैदान पार्किंगसाठी खुले आहे; पण तेथील वाहन क्षमताही मर्यादित आहे. परंतु, काही चालक अंबाबाई मंदिरापासून हे स्थळ थोडे दूर असल्याची कारणे देत येथे पार्किंगला पसंती देत नाहीत. गांधी मैदान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, पंचगंगा घाट, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील १०० फुटी रस्ता हे उत्सव काळासाठीच पार्किंगला खुली केली जातात. शहरात येणाऱ्या पर्यटकांना पार्किंग स्थळे कोणती, तेथे जाण्याचा मार्ग तेथून मंदिर, रंकाळा, जोतिबा, पन्हाळ्‍याकडे जाण्याचा मार्ग अंतर याची माहिती देणारे फलकच नाहीत.

या मार्गावर सतावतो प्रश्‍न...

  1. भाऊसिंगजी रोड

  2. महाद्वार रोड

  3. पापाची तिकटी

  4. पाच बंगला परिसर

  5. स्टेशन रोड

  6. मध्यवर्ती बसस्थानक परिसर

  7. गवत मंडई शाहूपुरी

  8. कसबा बावडा

  9. गंगावेश

  10. रंकाळा स्टँड

  11. दुधाळी परिसर

  12. रंकाळा टॉवर

  13. बागल चौक ते पार्वती चित्रमंदिर सिग्नल चौक

दृष्‍टिक्षेपात...

  1. शहरातील सिग्नल - ३४

  2. एकेरी मार्ग - २९

  3. वाहतूक पोलिस - १०४

  4. मिळकती - १,५०,०००

  5. रस्ते - ८९४.९२ कि.मी.

  6. जिल्ह्यातील वाहनांची संख्या - १५ लाख ४६ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT