बेळगाव : विजयनगर हिंडलगा येथील घरफोडीची घटना ताजी असतानाच नजीकच्या जयनगर येथील एका दारू दुकान मालकाचा बंगला फोडण्यात आला. काल (७) रात्री अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून अर्धा किलो १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रोकड असा एकूण २० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. घटनेची नोंद एपीएमसी पोलिस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा - बेळगावात 50 वर्षांची शारदोत्सवाची परंपरा खंडित
याप्रकरणी श्रीधर परशराम सुलाखे (रा. प्लॉट नंबर २१ जयनगर) यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्री. सुलाखे यांचे यंदे खुट येथे वाईनशॉप आहे. ते आपल्या कुटुंबीयासह गेल्या काही वर्षांपासून जयनगर येथे वास्तव्यास आहेत. काल सकाळी आकराच्या सुमारास ते काही कामानिमित्त शिगावला गेले होते. काम आटोपून ते त्याच रात्री ११ च्या सुमारास पुन्ही घरी परतले. दर्शनी दरवाजा इंटरलॉक खोलून आत प्रवेश केला. बेडरुमध्ये जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी कपाट फोडल्याचे दिसून आले.
कपाटातील अर्धा किलो सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रोकड असा एकूण वीस लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज पळविल्याचे दिसून आले. चोरट्यांनी समोरील खडकीचे गज कापून आत प्रवेश केल्याचे लक्षात येताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. लागलीच एपीएमसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
त्यानंतर साहाय्यक पोलिस आयुक्त सी. आर. निलगार, कॅम्पचे एसपी चंद्राप्पा यांनीही भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनेची नोंद करुन घेत घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहर उपनगरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.