Chandrakant Patil
Chandrakant Patil esakal
कोल्हापूर

चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं! कोल्हापुरात लागले This is Dhangekar बॅनर

रुपेश नामदास

Ravindra Dhangekar: राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणूकीत भाजपचा धक्कादायक रित्या पराभव झाला. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना धुळ चारत दणदणीत विजय मिळवला.

या विजयानंतर भाजपवर जोरदार टीका झाली. टीका होत असताना चंद्रकांत पाटलांच्या एका विधानामुळे त्यांच्यावर देखील जोरदार टीका होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसब्यात प्रचारा दरम्यान म्हणाले होते Who Is Dhangekar हाच धागा पकडून आता पुण्यासह कोल्हापूरमध्ये बॅनर लागले आहेत.

This is Dhangekar हा बॅनर कोल्हापूर शहरातील कावळा नाका चौक परिसरात चंद्रकांत पाटलांना डिवचण्यासाठी मविआकडून लावण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनरची चर्ची जिल्ह्यात आहे.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली.

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या 25 वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे कारण शोधण्यासाठी भाजपला नक्की विचार करावा लागणार आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसब्यात तळ ठोकून होते.

कसब्याच्या निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ट्विट केलं होतं की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.

या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू! असं ट्विटमध्ये लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT