Government Primary Kannada School esakal
कोल्हापूर

Government School : 200 विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत तीन भिंती कोसळल्या; प्रार्थना सुरु असतानाच घडली दुर्घटना

विद्यार्थी प्रार्थना करत असतानाच तीन खोल्यांच्या भिंती कोसळल्या

सकाळ डिजिटल टीम

भिंती जीर्ण झाल्याची बाब शिक्षण खात्याच्या निदर्शनास आणूनही कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. पण या घटनेत सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही.

खानापूर : तालुक्यातील इटगी ग्रामपंचायत (Itagi Gram Panchayat) कार्यक्षेत्रातील बेडरहट्टी गावातील सरकारी (Government school) उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या (Kannada School) तीन खोल्या शुक्रवारी (ता. २८) कोसळल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी मैदानात प्रार्थनेसाठी उभे होते.

त्यामुळे सुदैवानेच विद्यार्थी (Students) मोठ्या संकटातून बचावले. याबाबत अधिक माहिती अशी, या शाळेत पहिली-सातवीपर्यंत २१० विद्यार्थी शिकत आहेत. शुक्रवारी सकाळी विद्यार्थी प्रार्थना करत असताना तीन खोल्यांच्या भिंती आणि छत कोसळले. गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

भिंती जीर्ण झाल्याची बाब शिक्षण खात्याच्या निदर्शनास आणूनही कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. पण या घटनेत सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही. त्यात काही बरे-वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

बेडरहट्टी शाळेच्या भिंती कोसळल्याचे वृत्त समजताच तहसीलदार प्रकाश गायकवाड, गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची, क्षेत्र समन्वयक अप्पाण्णा अंबगी, ​​बीईओ कार्यालय निरीक्षक शंकर कम्मार, महसूल निरीक्षक एस. बी. टक्केकर, पंचायत राज विभागीय अभियंता डी. एम. बन्नुरे, पीडीओ वीरेश सज्जन, ग्राम प्रशासकीय अधिकारी एम. ए. जकाती व इतरांनी भेट देऊन शाळेच्या कोसळलेल्या खोल्यांची पाहणी केली.

एसडीएमसी अध्यक्ष अदृश्य दोडवाड यांनी, शाळेच्या खोल्यांची दूरवस्था झाली आहे. नुकत्याच बांधलेल्या तीन कॉंक्रिट खोल्या गळत आहेत. शाळेतील स्वयंपाकघराची खोलीही कोसळली आहे. त्यामुळे तात्काळ नवीन खोल्या बांधून द्याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मुलांच्या शिक्षणाकडे तातडीने लक्ष दिले जाईल, असे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी इराप्पा दोडमणी, गंगाप्पा बडली, विठ्ठल किलोजी, बसवराज तुरमरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT