Three women were killed in gudas by accident 
कोल्हापूर

ब्रेकिंग - बोलेरोच्या धडकेत गुडस येथील तीन महिला जागीच ठार 

सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी (बेळगाव) - बोलेरो वाहनाने धडक दिल्याने तीन महिला ठार तर अन्य दोघे जखमी झाले. आज (ता. 28) हुक्केरी तालुक्यातील गुडस येथे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जयश्री मालदंडी (वय 40), प्रेमा बंगारी (वय 38), सुमित्रा गिलानी (वय 35, रा. सर्व गुडस) अशी मयतांची नावे आहेत. अपघातानंतर  एका महिलेला  वाहनाने  सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत नेले होते. हुक्केरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बोलेरो (केए 22 डी 1405) वाहनातून शेतातील भाजीपाला विक्रीसाठी नेण्यात येत होता. हे वाहन रस्त्यावर आले. त्यावेळी रस्त्यावरून तीन महिलांसह काहीजण निघाले होते. अचानक त्यांच्या अंगावरून बोलेरो गेल्याने जयश्री मालदंडी, प्रेमा बंगारी व सुमित्रा गिलानी या जागीच ठार तर आणि दोघे जखमी झाले. त्यातील एका महिलेला वाहनाने सुमारे दोनशे मीटर पर्यंत फरफटत नेले होते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तात्काळ जखमींना घटप्रभा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुक्केरी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनटी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. हुक्केरी पोलिस अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहेत.

अपघातामुळे एकाच गावातील तीन महिलांचे निधन झाले. त्यामुळे गुडस गावावर शोककळा पसरली होती. या अपघातामुळे तीन कुटुंबे कोलमडून पडली होती. तसेच नागरिकांसह नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या तोंडून यावेळी हळहळ व्यक्त होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Latest Marathi News Live Update : मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना CCTV मध्ये कैद

अनफेअर एव्हिक्शन ! बिग बॉस मराठीला संकेत पाठकचा अलविदा; चाहते संतापले "स्क्रिप्टेड शो.."

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT