three youth together inventories a automatic tea machine in kolhapur as a start up
three youth together inventories a automatic tea machine in kolhapur as a start up 
कोल्हापूर

वाफाळलेल्या चहाची लज्जत भारी ; कोल्हापुरच्या ऑटोमशिनची किमयाच न्यारी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : चहा प्यायचा तर तो वाफाळलेळा फक्कड असाच, अशा चहाला एक वेगळी चवही येते. सध्या जागोजागी अमृततुल्य सारखी चहाची दुकाने सुरू झाली आहेत. दुसरीकडे मशिनचा चहा म्हणजे पावडरचा चहा. त्याला चव नाही, की वाफाळलेल्या चहासारखी मजा नाहीच, त्यामुळे तो प्यायला नकोच अशी मानसिकता असतानाच कोल्हापुरातील तिघा तरुणांनी वाफाळलेला आणि फक्कड असा अमृततुल्यसारखा चहा देणारे मशिन तयार केले आहे. त्यामुळे वाफाळलेळा आणि हवा तसा चहा आता उपलब्ध होत आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ऑनलाईन वॉच ही ठेवण्याचे काम तिघांनी केले आहे. 

सिद्धार्थ व सिद्धांत गद्रे हे दोघे सख्खे भाऊ व सिद्धार्थ माळी हा घराशेजारीच राहणारा त्यांचा मित्र, तिघांनी मिळून काहीतरी नवीन करावे, असे ठरवले व घरीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून चहामध्येच काहीतरी वेगळे करायचे ठरविले. त्यांचा पिढीजात चहाचा व्यवसाय, त्यामुळे ताजा चहा (घरच्याप्रमाणे) अद्यावत तंत्रज्ञान वापरून कसा करता येईल?, याचा विचार करून मशिन बनवण्याचे ठरवले आणि त्यांनी ते बनविले. कोल्हापूरसह बंगळूर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि इंग्लडला येथे त्यांचे फक्कड चहा देणारे  मशीन पोचले.

मशिनमधील ‘प्रिमिक्‍स’चा चहा दर्जेदार नसल्याचा सूर होता. 
त्यावर उपाय म्हणून त्यांनी  स्वतःच मशीन बनविले. आता इंटरनेटद्वारे बंगळूरमध्ये किती चहाचे कप झाले, याचेही अपडेट त्यांना त्यांच्या मोबाइलवर मिळते. एवढेच नव्हे तर चहाचा कोणताही प्रकार त्यांनी तयार केलेल्या मशीनमध्ये होतो. केवळ विकतच नव्हे तर भाड्यानेसुद्धा ते हे मशीन ते देतात. नव्या युगाची नवी कल्पना, स्कील काय असू शकते, याचे हे एक हे उत्तम उदाहरण आहे.

सिद्धार्थ यांचा ‘सी ए फायनचा’ एक ग्रुप झाला आहे, सिद्धांत कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. सिद्धार्थ माळी हे इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंग करत आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी घरातच वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली व एक सेमी ऑटोमॅटिक फ्रेश चहा व कॉफीचे मशीन बनविले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; पण अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर त्यात होत नव्हता. म्हणून इलेक्‍ट्रॉनिकस, सॉफ्टवेअर व हार्डवेअर यांचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली, चहा पावडर, दूध, साखर, पाणी कसे व कधी वापर करून चांगल्या प्रतिचा ताजा चहा करायचे प्रयोग चालू केले.

जगात प्रथमच असे पूर्णपणे ऑटोमॅटिक फ्रेश चहा व फिल्टर कॉफीचे मशीन तयार केले असावे, असेही सिद्धांत यांनी सांगितले. या मशीनमध्ये काही सेकंदात घरच्यासारखा चहा किंवा कॉफी तयार होऊन कपात येतो, यातूनच ‘सुपर ब्रू’ मशीनचा जन्म झाला. ‘सुपर ब्रू’ मधून येणारा चहा हा उकळून केलेल्या ताज्या चहाप्रमाणे आपल्याला काही सेकंदातच तयार होऊन मिळतो. सिद्धार्थ गद्रे, सिद्धांत गद्रे व सिद्धार्थ माळी या युवकांच्या अथक प्रयत्नातून हे मशीन तयार झाले आहे.


मशीनमधून लेमन टी, ग्रीन टीही

या मशीनचा उपयोग मोठ्या ऑफिसेस, ब्रॅण्ड चहा, कॉफी केन्द्र अथवा हॉटेलमध्ये करता येतो. मशीनची विक्री हैदराबाद, बंगलोर, पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी झाली आहे, होत आहे. लेमन टी, ग्रीन टी, दुधाचा चहा असे कोणतेही प्रकार तुम्ही तुमच्या मशीनमधील सेटींग बदलून चहा तयार करू शकता. एवढंच नव्हे तर ऑनलाईन पेमेंट केल्यास तुम्ही चहाच्या मशीनजवळ जाऊन थांबला तरीही तुम्हाला क्‍युआर कोडद्वारे चहा मिळतो. मशीन, त्याची किंमत व इतर माहिती त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली आहे.

अशी आहे खासियत

आता चहा मशिनची तीन पेटंट ते घेत आहेत. मशिन पूर्णपणे ऑटोमॅटिक असून ते सॉफ्टवेअर बेसवर ऑपरेट होते, व इंटरनेटला कनेक्‍ट होऊन ऑनलाईन डॅश बोर्डवर मशीनची सर्व माहिती घेता येते. डिजिटलबेस असल्यामुळे त्यात बऱ्याच कॉम्बिनेशनचे चहा, मसाला चहा व फिल्टर कॉफी करता येतात. दूध, साखर आदी गोष्टी आपल्याला हवेतसे बदल करून चहा किंवा कॉफी  करता येते. हे सर्व सॉफ्टवेअरमुळे शक्‍य झाले आहे. 
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT