कोल्हापूर

तुळशी, धामणी परिसरात मॉन्सूनपूर्व शेतीकामांना वेग

CD

01575
धामोड (ता. राधानगरी) ः येथे ऊस भरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. (छायाचित्र : केरबा जाधव)
.........
तुळशी, धामणी परिसरात
मॉन्सूनपूर्व शेतीकामांना वेग

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. १४ : राधानगरी तालुक्याच्या पश्चिम तुळशी व धामणी परिसरात मॉन्सूनपूर्व शेतीच्या कामाला वेग आला आहे. उष्णतेचा पारा वाढत असतानाही येथील शेतकरी मशागतीच्या कामात मग्न झाला आहे. ऊस भरणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये अद्यापही वळवाने हुलकावणी दिली आहे. मे महिन्यात शेतीची धांदल सुरू होते. सध्या माळरानावरील भातशेतीसाठी बैलांच्या सहाय्याने शेत तयार करण्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर नांगरणी, बांध घालणे या कामात शेतकरीवर्ग गुंतलेला पाहायला मिळत आहे. भातशेतीसाठी तरवे तयार करण्याचे कामही सुरू आहे. परिसरात सर्वाधिक ऊसपीक घेतले जाते. ऊस भरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मशागतीच्या कामासाठी शेतकरीवर्गातून ट्रॅक्टर साधनाला पसंती दिली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT