कोल्हापूर

आदर्श शिक्षक पुरस्कार मेघन देसाई यांना प्रदान

CD

05293
अतिग्रे: मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना मेघन देसाई व सौ. संजीवनी देसाई.

आदर्श शिक्षक पुरस्कार
मेघन देसाई यांना प्रदान

जयसिंगपूर, ता.२६ : येथील नगरपालिका शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख मेघन देसाई यांना आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेने क्रांतीसुर्य महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२३ ने सन्मानित केले.
महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभ अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठात झाला. राज्यातील चाळीस शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले. जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने अध्यक्षस्थानी होते. जिल्हा व्यवस्थापक ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद कोल्हापूरचे सचिन पाटणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तानाजी पवार तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ झाला. मेघन देसाई यांची ३३ वर्ष सेवा झाली असून पंधरा वर्षे ते केंद्र प्रमुख म्हणून नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर येथे कार्यरत आहेत. उत्कृष्ट शिक्षक व प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT