कोल्हापूर

कर्तव्ये, ग्रामपंचायत समजून घ्या

CD

gad62.jpg
80768
गडहिंग्लज : दलित महासंघातर्फे नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्‍यांचा सत्कार झाला. या वेळी डी. वाय. माने, प्रकाश कांबळे, बाबूराव आयवाळे, अजित दावणे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------
कर्तव्ये, ग्रामपंचायत समजून घ्या
प्राचार्य माने : दलित महासंघातर्फे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : निवडून दिलेल्या ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. लोकशाही ही लोकांच्या कल्याणासाठी आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली कर्तव्ये आणि ग्रामपंचायत म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन तेरणी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. वाय. माने यांनी केले.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुका दलित महासंघातर्फे या विभागातील मातंग समाजातून निवडून आलेल्या व पराभूत उमेदवारांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष बाबूराव आयवाळे अध्यक्षस्थानी होते. हरळी खुर्दच्या सरपंच साधना आयवाळे, सदस्य प्रदीप आयवाळे, महागावचे परशुराम हुले, होन्याळीचे उपसरपंच सचिन हुंचाळे, तेऊरवाडीचे संतराम मांग, भडगावच्या रोहिणी मांग, अर्दाळचे धनाजी ससाणे, भादणवाडीतील सरला आनावरे, येणेचंवडीतील अंजली ऐवाळे यांचा सत्कार केला.
माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी जनतेला न्याय देण्यासाठी नूतन ग्रामपचांयत पदाधिकाऱ्‍यांनी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत मांडले. बाबूराव आयवाळे यांनी समाजाच्या कल्याणासाठी संघटना कटिबद्ध असून समाजानेही संघटित होण्याची गरज असल्याचे व्यक्त केले. तालुकाध्यक्ष सुरेश चव्हाण, अजित दावणे, खजिनदार विजय दावणे, माजी उपाध्यक्ष उमेश साठे, सागर हेगडे यांची भाषणे झाली. शिवानंद आयवाळे, बापू अनावरे, रमेश मांग आदी उपस्थित होते. उमेश साठे यांनी स्वागत केले. सागर हेगडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT