कोल्हापूर

आजरा ः आजरा कारखाना बिले जमा

CD

फेब्रुवारीअखेरची
‘आजरा’ची बिले जमा

आजरा, ता. २४ ः येथील आजरा शेतकरी साखर कारखान्याची १ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गाळप झालेल्या ५२ हजार १७७ टन ऊसाची रू.३००० प्रमाणे होणारी रक्कम रु.१५. ६५ कोटी रुपयांची ऊस बिले विनाकपात संबंधित शेतक-यांच्या बॅंक खात्यावर जमा केली आहेत. हंगामात आलेल्या संपूर्ण ऊसाचे बिल आदा केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.
आजरा साखर कारखान्याने आजअखेर ११९ दिवसांत ३ लाख ३६ हजार मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी १२.११ टक्के साखर उता-याने ४,०६,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्यवस्थापनाने ४ लाख टन ऊसाचे गाळप करणेचे उदिष्ट ठेवले होते. पण अतिपावसामुळे उस उता-यामध्ये १० टक्के घट झाली. तसेच तोडणी वाहतुक यंत्रणा काही अंशी कमी पडली. त्यामुळे ठरविलेले उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत आदा करणेचे नियोजन कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने कारखान्याने केलेले आहे. त्याचप्रमाणे चालु लागवड हंगामाकरीता ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती गट कार्यालयातदेखील सुरू आहेत. गुढीपाडव्या पासून यंदाच्या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतुकीचे करार सुरु केले आहेत. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी व संचालक विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, श्रीमती अंजना रेडेकर, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारूती घोरपडे, सुनीता रेडेकर, उदयसिंह उर्फ मुकुंदराव देसाई, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, अनिल फडके, मलिककुमार बुरूड, तानाजी देसाई तसेच मा.कार्यकारी संचालक, डॉ. टी. ए. भोसले, सचिव व्ही. के. ज्योती उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT