कोल्हापूर

मुंबई-कोल्हापूर विमान

CD

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ५ एप्रिलपासून

स्टार एअरवेजची सुविधा ः मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवारी सेवा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याचा टप्पा पूर्ण करत असलेल्या कोल्हापूर विमानतळावरून आता आठवड्यातील चार दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअरवेजच्या माध्यमातून या सेवेची सुरुवात ५ एप्रिलपासून होत आहे. दर मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवारी ही सुविधा सुरू राहील.
अलीकडेच विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लँडिंग, टॅक्सी पार्किंग आदी सुविधा कोल्हापूर विमानतळावर सुरू झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर विमानतळावरून अहमदाबादमार्गे दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, तिरुपती आदी विमानसेवा सुरू आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून दोनच वेळा सुरू होती, पण या विमानांच्या वेळा सोयीस्कर नव्हत्या. यावर मार्ग काढण्यासाठी स्टार एअरची नवी विमानसेवा कोल्हापूर-मुंबई मार्गावर सुरू होत आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर ५ एप्रिलपासून सेवा सुरू होत आहे. मुंबईहून सकाळी साडेदहा वाजता विमानाचे टेकऑप होऊन सकाळी साडेआकरा वाजता ते कोल्हापुरात पोहोचेल. कोल्हापुरातून मुंबईसाठी ११.५५ वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि ते १२ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल.
.........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT