MLA Prakash Awade Sulkud Water Scheme
MLA Prakash Awade Sulkud Water Scheme esakal
कोल्हापूर

Sulkud Water Scheme : ..अन्यथा इचलकरंजीला सुळकूडमधूनच पाणी घेण्यात येईल; आमदार आवाडेंचा स्पष्ट इशारा

सकाळ डिजिटल टीम

कागलमधून या योजनेला कसलाही विरोध नाही. पण, आता लोकसभा निवडणूकजवळ आली असल्याने सर्वजण एकमेकांच्या सुरात सूर मिसळत आहेत.

इचलकरंजी : ‘धरण दुरुस्तीमुळे साठा कमी केल्याने पाण्याची कमतरता दिसत आहे. मात्र, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जर पाणी कमी पडत असेल अन्य पर्याय शोधण्यात येईल. अन्यथा इचलकरंजीला सुळकूडमधूनच (Sulkud Water Scheme) पाणी घेण्यात येईल. धरण दुरुस्तीसाठी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत आम्ही थांबण्यास तयार आहोत. पण पाणी सुळकूडचेच आणणार आहोत’, असा निर्धार आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी व्यक्त केला.

ज्यांना इचलकरंजीच्या (Ichalkaranji) पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू नये असे वाटते, त्यांच्याकडून १०० शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करू दिले जात नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. येथील सांगली नाका ते यड्राव फाटा रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर होते. याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते.

आमदार आवाडे म्हणाले, ‘कमी पाण्याचे कारण सांगत सुळकूडची जागा बदला असे सांगितले जात आहे. पण जागा का बदलायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. तर मनात येईल तेव्हा जागा बदलत राहिलो तर योजनाच होणार नाही. कागलमधूनही या योजनेला कसलाही विरोध नाही. पण आता लोकसभा निवडणूकजवळ आली असल्याने सर्वजण एकमेकांच्या सुरात सूर मिसळत आहेत. म्हणूनच दोन वर्षे थांबण्याची आमची सहनशिलता असून पाणी सुळकूडमधूनच आणणार आहे. इचलकरंजीत केवळ राजकारण सुरू असून कोणता अधिकारी कोणाचा हे शिक्केच मारले आहेत. त्यातूनच १०० शुद्धपेयजल प्रकल्प सुरू झालेले नाहीत.’

राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, ‘इचलकरंजी आणि शिरोळचा आड्यावर आडा असल्याने पाणी द्यायला कोणाचाच विरोध नाही. मात्र, ते कोठून द्यायचे यावर राजकारण होता कामा नये. मुंबईतील बैठकीत आवाडे यांनी विस्तृतपणे माहिती मांडली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या हक्काचे पाणी जाऊ नये, यासाठीच मते मांडली. आचारसंहितेचे बंधन पाणी प्रश्‍नात येणार नसल्याने सुळकूडचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल.’ यावेळी रामचंद्र डांगे, प्रकाश दत्तवाडे, नाना पाटील, बाबासाहेब चौगुले, दादासाहेब सांगावे, सुकुमार किणिंगे, बाळासाहेब कलागते, राजवर्धन नाईक-निंबाळकर, अशोक माने, विजय भोजे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT