कोल्हापूर

नानीबाई चिखली - महालक्ष्मी यात्रा

CD

01917, 01918
महालक्ष्मी देवीच्या यात्रेची
नानीबाई चिखलीत लगबग

आज इरडे घालण्याचा कार्यक्रम


नानीबाई चिखली, ता. ४ ः येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पाच दिवसांवर आलेली आहे. लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिराच्या नूतन वास्तूत प्रथमच यात्रा भरत आहे. यात्रेनिमित्त रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आहे.
संस्थान काळापासून तीन वर्षांनी महालक्ष्मी यात्रा भरते. २०२० मध्ये कोरोनामुळे यात्रा भरली नाही. २०२० ला जुलैमध्ये महापुरात मंदिराच्या इमारतीचा भाग कोसळला. त्यानंतर लोकवर्गणीतून मंदिराची भव्य वास्तू उभारली.
शुक्रवारी (ता. ५) इरडे घालण्याच्या कार्यक्रमाने यात्रेचा प्रारंभ होईल. मंगळवारी (ता. ९) पहाटे पाच वाजता श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी ओटी भरणे, आंबिल-घुगऱ्या व रात्री ठीक ९ वाजता महालक्ष्मी देवीची मिरवणूक व आतषबाजी होईल.
बुधवारी (ता. १०) जेवणे व कार्यक्रम, रात्री नऊ वाजता मायबोली प्रस्तुत गीतराधाई सांस्कृतिक कार्यक्रम आहे. गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मी देवीची विसर्जन मिरवणुकीने यात्रेची सांगता होईल.
यात्रेची जोरात तयारी
सहा वर्षांनंतर होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त घरांची डागडुजी, रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामपंचायत, यात्रा कमिटी नियोजनात गुंतली आहे. दुकाने, स्टॉलसाठी मंदिराजवळ जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे. वीज वितरणकडून अखंडित वीज पुरवठ्यासाठी नियोजन सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT