Chaitra Yatra Jyotiba Temple
Chaitra Yatra Jyotiba Temple esakal
कोल्हापूर

Jyotiba Temple : दख्खनच्या राजाचा आज चैत्रोत्सव; जोतिबा डोंगरावर लाखभर भाविक दाखल, यंत्रणा सज्ज

निवास मोटे

डोंगरावर कोणत्याही घातपाताच्या घटना घडू नयेत, यासाठी मंदिरासह संपूर्ण गावात व घाट रस्त्यावर कडक सुरक्षा व्यवस्था यंत्रणा तैनात आहे.

जोतिबा डोंगर : येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या (Jyotiba Temple Kolhapur) चैत्र यात्रेचा आज (ता. २३) मुख्य दिवस आहे. यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यंदा यात्रेत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. सुमारे दहा लाखांवर भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

यात्रेच्या पूर्वसंध्येलाच आज सुमारे लाखभर भाविकांनी डोंगर फुलला होता. डोंगरावर कोणत्याही घातपाताच्या घटना घडू नयेत, यासाठी मंदिरासह संपूर्ण गावात व घाट रस्त्यावर कडक सुरक्षा व्यवस्था यंत्रणा तैनात आहे. जलद कृती दल, व्हाईट आर्मी (White Army) घातपात विरोधी पथके, तसेच सेवाभावी संस्थांचे जवान यांची पथके सज्ज आहेत. आज संपूर्ण गावातून श्वानपथक फिरवण्यात आले.

सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यात्रा तयारीची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अगदी सूक्ष्म नियोजन करून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे येडगे यांनी यावेळी आवाहन केले. त्यांनी रस्ते, दर्शनरांग, मंदिर परिसराची पाहणी केली.

कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट, वडणगे, निगवे, कुशिरे, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी या भागांतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. हलगी, सनई, पिपाणीच्या सुरामध्ये सासनकाठ्या नाचत डोंगराकडे येत होत्या. या भागातील ग्रामस्थांनी भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा तसेच प्रसादाची व्यवस्था केली आहे. डोंगरावर दिवसभर उन्हाचा कडाका होता. त्यामुळे दुपारी आलेल्या भाविकांनी डोंगरावरील हिरव्यागार झाडांचा आधार घेत विश्रांती घेतली. काही भाविकांनी राहाण्याच्या जागा निश्चित केल्या.

मानाच्या सासनकाठ्या दाखल

दुपारी चारनंतर डोंगरावर पाडळी (जि. सातारा), विहे (ता. पाटण), किवळ (ता. कऱ्हाड), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), दरवेश पाडळी मनपाडळे (ता. हातकणंगले), सांगलवाडी (सांगली) यांच्यासह इतर मानाच्या सर्व सासनकाठ्या मूळ माया यमाई मंदिर परिसरात दाखल झाल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अधीक्षक धैर्यशील तिवले यांनी मानाचा विडा देऊन त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर या सासनकाठ्या शासकीय विश्रामगृह, नवीन वसाहत पाणी टाकीमार्गे दक्षिण दरवाजातून मुख्य मंदिरात गेल्या. यावेळी ‘चांगभलं’चा जयघोष, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत सासनकाठ्या मंदिर परिसरात नाचवित आल्या. डोंगरावर दिवसभर भाविकांच्या झुंडी येत राहिल्या. आजच पंचवीस टक्के डोंगर गर्दीने फुलून गेला होता. त्यांनी केलेल्या गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीमुळे डोंगर गुलालमय झाला. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने लाखो भाविकांची पावले डोंगरावर पडणार आहेत.

पाणपीठ उपवास

पाडळी (जि. सातारा) येथील शंभर ग्रामस्थ कामदा एकादशी दिवशी सकाळी घरातून अनवाणी जोतिबा डोंगराकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांचे आज सकाळी जोतिबा डोंगरावर आगमन झाले. त्यांनी केवळ पीठ आणि पाणी पिऊन उपवास केला होता. त्यांनी आज पुजारी गजानन लादे यांच्या घरी येऊन पुरणपोळी खाऊन उपवास सोडला. पाडळीच्या ग्रामस्थांनी जपलेली परंपरा आजही सुरू आहे.

अन्नछत्रावर झुंबड

गायमुख तलाव येथे असणारे सहज सेवा ट्रस्ट व डोंगरावर असणारे आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या अन्नछत्रावर भाविकांची झुंबड उडाली. या ठिकाणी दिवसभर भाविकांच्या रांगा होत्या.

मंदिरात आज होणारे कार्यक्रम

  • पहाटे चार वाजता घंटानाद

  • पहाटे चार ते पाच ‘श्रीं’ची पाद्यपूजा, काकड आरती

  • सकाळी सहाला शासकीय महापूजा

  • आठला जोतिबा देवाची राजेशाही महापूजा

  • ९ ते ११ - मंदिर दर्शनासाठी खुले

  • दुपारी १२ ला धुपारती सोहळा व अंगारा

  • यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सासनकाठ्या मिरवणूक प्रारंभ

  • सायंकाळी साडेपाचला पालखी सोहळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT