Uday Samant sakal
कोल्हापूर

'पंतप्रधानांवर बोललं तर देशद्रोहाचा गुन्हा, मुख्यमंत्र्यांवरही कोणी बोलू नये'

रावसाहेब दानवे यांच्या भूमिका काय आहेत, हे सर्वांना माहीत आहे - सामंत

सकाळ वृत्तसेवा

रावसाहेब दानवे यांच्या भूमिका काय आहेत, हे सर्वांना माहीत आहे - सामंत

कोल्हापूर : पंतप्रधानांवर (PM Modi)बोलल्यावर देशद्रोहाचा गुन्हा होत असेल तर मुख्यमंत्र्यांवरही कोणी बोलू नये, असा रोखठोक इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. शिवसेना (Shivsena) सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त ते कोल्हापुरात आले होते राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी सामंत म्हणाले, 'राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्यावर निषेधाचे ठराव होऊ नयेत, अशी भूमिका मी घेतली. तशा सूचना विद्यापीठांना दिल्या. पंतप्रधानांवर कोणी बोलले तर लगेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यावरही (CM Uddhav Thackeray) कोणी बोलू नये. रावसाहेब दानवे यांच्या भूमिका काय आहेत, हे सर्वांना माहीत आहे. शेतकऱ्यांबद्दल ते काय बोलले, याचीही नागरिकांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर खुलासा देणे योग्य होणार नाही.' ते म्हणाले, 'संवर्गनिहाय प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाकडे आहे. राज्यात प्राध्यापक भरती सुरू आहे. ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले होते. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता आली नाही, त्यांचे नुकसान होणार नाही. ते परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.'

'उत्तर'बाबतकार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊ

कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोट निवडणुकीचा हा मेळावा नाही. पक्षबांधणीसाठी हा मेळावा आठ दिवसांपूर्वी आयोजित केला आहे. मात्र या मेळाव्यात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT