Kolhapur Sakal
कोल्हापूर

चुलीवरच्या वडापावाची चवच न्यारी

कदम बंधुंची बेरोजगारीवर वेगळ्या प्रयोगाने मात; विट्याच्या खाद्यशौकिनांत चवदार चर्चा

अजित कुलकर्णी

सांगली : मस्त पावसात गरमागरम भजी, वाफाळलेली कॉफी, चटकदार वडापावची आठवण आल्याशिवाय रहात नाही. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेला वडापाव आज खेडोपाड्यातही सहज मिळतो. मऊ मऊ पावात तिखट गोड चटणी आणि आणि कुरकुरीत तळलेल्या वडापावची खुमारीच न्यारी. महाराष्ट्राचा ‘बर्गर’ म्हणून ओळखला जाणारा वडापाव आज सर्वसामान्यांची भूक भागवतो. विटा (ता. खानापूर) येथील दोघा बंधूंनी त्यात वेगळेपण आणत चुलीवर तळत त्याची लज्जत आणखी वाढवली आहे.

विटा येथील रोहित व सुमित वसंत कदम या बंधूंनी वेगळी वाट चोखाळत पारंपरिकतेला छेद देत ‘हट के’ प्रयोग केला. रोहितने प्रिटिंग डिप्लोमापर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर टी-शर्ट प्रिटिंग्स डिझाईन, डिजिटल छपाईत नाव कमावले. तर सुमितने फूड टेक्नॉलॉजीत बी. टेक.पर्यंतचे शिक्षण घेतले. शिकून पुढे काय? असा सार्वत्रिक प्रश्न दोघांसमोर असताना वडापाव चुलीवर करण्याचा विचार चमकून गेला. देशी जुगाड करत विटा, मातीचा वापर करून दोघांनी मोठी कढई बसेल, अशी ‘जंबो’ चूल बनवली.

तत्पूर्वी गतवर्षी त्यांनी तासगाव नाक्यानजीक पारे रस्त्यावर उन्हाळ्यात रसवंती चालवली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे तो प्रयत्न तेवढा यशस्वी झाला नसला तरी व्यवसायाची ओळख झाली होती. घरच्या देशी उसापासून थंडगार व स्वच्छ रस तयार करून अस्सलतेची चव दाखवली होती. गॅसवर ‘इन्स्टंट’ पेक्षा चुलीवर तळलेल्या चुरचुरीत, चटकदार वडापावने पावले आपोआप वळू लागली. जळण फोडण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत पडेल ती कामे करण्याची तयारी बंधूनी ठेवली आहे.

नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी उद्योग असावा, या भावनेने वडापाव व्यवसायात आलो. ऊसशेती सांभाळत जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आता चांगला सुरु आहे. चुलीवर खरपूस तळल्याने वडा आरोग्याला अजिबात अपायकारक होत नाही. हा प्रयोग नव उद्योजकांनी करावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करू.

- रोहित कदम, वडापाव व्यावसायिक, विटा

हट के रेसिपीने वडा ‘टेस्टी’

हट के रेसिपीला घरच्या अस्सल मसाल्यांची जोड असल्याने कदम यांचा वडा चर्चेत आहे. त्यांच्या आई कल्पना व पत्नी पूजा यादेखील मदतीसाठी तत्पर असतात. स्वतःच्या पिकवलेल्या मिरच्या, कांदा, कोथिंबीरचा वापर होत असल्याने वड्याची चव जिभेवर रेंगाळत राहत असल्याचे खाद्य शौकिन सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचं मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT