political esakal
कोल्हापूर

मुश्रीफांविरुद्धच नेत्यांचे कट कारस्थान; आमदार कोरेंचा आरोप

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे तीन उमेदवार पराभूत झाले.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या उमेदवारांविरोधातच काम केलेल्या नेत्यांचा लेखाजोखाच आमदार डॉ. विनय कोरे (Vinaya kore) यांनी नेत्यांच्या बैठकीत मांडला. (KDCC) ज्यांनी आघाडीविरोधात मतदान केले त्यांची नावे घेऊन तालुकानिहाय पंचनामाच त्यांनी बैठकीत करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्या विरोधातच हे कट कारस्थान होते, असाही गंभीर आरोप केल्याचे समजते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे तीन उमेदवार पराभूत झाले. यावरून श्री. कोरे निकालाच्या दिवसापासून तीव्र भावना या ना त्या निमित्ताने व्यक्त करत आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मला गृहीत धरू नका, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर आयोजित सत्तारूढ गटाच्या बैठकीतच त्यांनी नेत्यांना खडे बोल सुनावल्याचे समजते.

शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही बँक चांगली चालावी, ती राजकारण विरहीत असावी म्हणूनच मी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो. त्यातूनही पॅनेल करताना मतभेद झाले असतील; पण एकदा उमेदवार ठरल्यानंतर फसवाफसवी कशासाठी, असा सवालही त्यांनी या बैठकीत उपस्थित केला. पॅनेलचे उमेदवार ठरवताना ज्यांनी विरोधात काम केले त्यांनी त्याच वेळी उमेदवारीवर आक्षेप घ्यायला हवा होता. त्या वेळी पुन्हा चर्चा करून मार्ग काढता आला असता.

एकदा उमेदवार ठरल्यानंतर राधानगरी, करवीर, भुदरगड तालुक्यांत आघाडीच्या उमेदवारांना नेत्यांच्या घरातीलही मते मिळत नाहीत याचा अर्थ काय, एवढ्या मोठ्या उंचीवर काम करणाऱ्या नेत्यांकडूनच असा विश्‍वासार्हतेला तडा दिला जात असेल तर हे चांगले नाही, असाही टोला त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व इतरांची नावे घेऊन लगावल्याचे समजते. यावर ए. वाय. यांनी आपली चूक याच बैठकीत मान्य केल्याचीही चर्चा आहे. सत्तारूढ गटाच्या पॅनेलची जबाबदारी फक्त माझ्यावर नव्हती तर हसन मुश्रीफ यांच्यावरही होती; पण मुश्रीफ यांच्या विरोधातच कट कारस्थान केले. आजऱ्यातून अशोक चराटी यांचा पराभव झाला आणि शाहूवाडीत रणवीर गायकवाड यांनी पाठिंबा दिला म्हणून तुम्ही वाचलात, असा टोलाही कोरे यांनी मुश्रीफ यांना उद्देशून बैठकीत लगावल्याचे समजते.

त्यांनी मन मोकळे केले ः मुश्रीफ

तालुकानिहाय आकडेवारीसह नेत्यांचा भांडाफोड करून श्री. कोरे बैठकीतून तडक निघून गेले. बाहेर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. श्री. मुश्रीफ यांनी मात्र कोरेंनी मन मोकळे केले एवढीच प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT