Hidkal Dam Vitthal-Rakhumai Temple esakal
कोल्हापूर

Hidkal Dam : हिडकल जलाशयात 1928 मध्ये उभारलेलं विठ्ठल-रखुमाई मंदिर अखेर पाण्याखाली; धरणात दर्शनासाठी होत होती गर्दी

१९६४ मध्ये हिडकल जलाशयाचे बांधकाम हाती घेतल्यानंतर १९७७ मध्ये हे मंदिर पाण्याखाली गेले.

सकाळ डिजिटल टीम

योगायोगाने १९ जून रोजी आषाढी एकादशी आल्याने विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी भाविकांची येथे मोठी गर्दी झाली होती.

गोकाक : गेल्या सव्वा महिन्यापासून हिडकल जलाशयात (Hidkal Dam Temple) पाणीपातळी कमी झाल्यामुळं विठ्ठल-रखुमाई मंदिराचे (Vitthal-Rakhumai Temple) दर्शन झाले होते. मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळं जलाशयातील पाणीपातळीत वाढ झाल्याने बुधवारी (ता. १९) हे मंदिर पाण्याखाली गेले.

हिडकल (ता. हुक्केरी) येथील राजा लखमगौडा जलाशयाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या होन्नूर येथे परिसरातील जनतेनं वंटमुरी देसाई यांच्या सहाय्याने १९२८ मध्ये मंदिराची उभारणी केली होती. मात्र, १९६४ मध्ये हिडकल जलाशयाचे बांधकाम हाती घेतल्यानंतर १९७७ मध्ये हे मंदिर पाण्याखाली गेले.

यावेळी जनतेनं राज्य सरकारच्या मदतीनं जलाशयातील मंदिराच्या बांधकामास धक्का न लावता नवीन जागेत त्याचं स्थलांतर केलं. ५१ टीएमसी क्षमतेच्या हिडकल जलाशयात १० टीएमसी पाण्याचा साठा झाल्यानंतर पाणी गाभाऱ्यापर्यंत येते. २० टीएमसी पाण्याचा साठा झाल्यावर कळसासह मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते.

यंदा १७ जून रोजी जलाशयाची पातळी १० टीएमसीपेक्षा कमी होऊन मंदिर दर्शनासाठी खुले झाले. योगायोगाने १९ जून रोजी आषाढी एकादशी आल्याने विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी भाविकांची येथे मोठी गर्दी झाली होती. यावर्षी पाऊस लांबल्याने महिनाभरापासून येथे भाविकांचा प्रचंड ओघ सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT