Amit Shah in Kolhapur
Amit Shah in Kolhapur 
कोल्हापूर

Amit Shah in Kolhapur : अमित शहा सासरवाडीत कमळ फुलवणार? रणनीती ठरली!

Sandip Kapde

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (१९ फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापुरात असणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अमित शहा यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

कारण कोल्हापूर पूर्णपणे भाजपमुक्त आहे. कोल्हापूर अमित शहा यांची सासरवाडी आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील हे देखील कोल्हापुरचे आहेत. मात्र भाजपला याठीकाणी नेहमी अपयश आलं. त्यामुळे थेट कोल्हापूरचे जावई कमळ फुलवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. 

कोल्हापूरकर भाजपला का नाकारतात, याचा अभ्यास अमित शहा करणार आहेत. शहा स्थानिक नेत्यांनी चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे. कोल्हापूरात लोकसभेसाठी भाजपला घाम गाळावा लागत आहे.

कोल्हापूरात आतापर्यंत भाजपचा अधिकृत उमेदवार विजयी झाला नाही. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार निवडून आले होते. मात्र शिवसेनेन भाजपची साथ सोडली. त्यामुळे भाजपला याचा आनंद साजरा करता आला नाही. 

मात्र शिंदे गटाने बंड केल्यानंतर दोन्ही खासदार शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने भाजपच्या जवळ आले. मात्र भाजपचा अधिकृत उमेदवार कोल्हापुरात नाही. त्यामुळे अमित शहांचा दौरा कोल्हापुरात कमळ फुलवण्यात यशस्वी ठरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

धनंजय महाडिक यांच्या रुपात भाजपला राज्यसभेत यश मिळाले आहे. मात्र लोकांमधून भाजपला अजून यश मिळाले नाही. त्यामुळे भाजप खासदार आणि आमदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांच्या जवळचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांची ऐवढी जवळीक नाही तेवढी जवळीक पाटलांची शहा यांच्या सोबत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. अमित शहा त्यांच्या पत्नी  सौ. सोनल शहा ह्या कोल्हापूरच्या आहेत. त्या  न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेत शिकल्या आहेत. या सोसायटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहा कोल्हापुरात आले आहेत. मात्र त्यांचे मुख्य ध्येय कोल्हापुरात भाजपचे कमळ फुलवणे असेल. 

अपक्ष आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार -

अमित शाह दौऱ्यावर येताच भाजपच्या आमदारांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थित हा प्रवेश पार पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT