डॉ. पवार sakal media
कोल्हापूर

कोल्हापूर : हलगर्जीपणा सहन करणार नाही; डॉ. भारती पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी खडसावले; आरोग्य व्यवस्थेचा आढावा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘केंद्रीय योजनांसाठी(central scheme) तुम्ही प्रस्ताव पाठवत नाही. कोरोना काळात(corona) अन्य रुग्णांची हेळसांड केली. तुमच्यात समन्वय नाही. आपण आरोग्य सेवेत काम करतो. कामासाठी टाळाटाळ का करता? हा हलगर्जीपणा मी अजिबात सहन करणार नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार(dr. bharati pawar) यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडसावले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या तक्रारींचा आढावा घेतला.

भारतीय जनता पक्षाच्या(bjp) ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आनंद गुरव यांनी सीपीआरमधील असुविधांचा पाढा वाचला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीच दाद दिली जात नसल्याचे त्यांनी मंत्री डॉ. पवार यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर मंत्री डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक(dhananjay mahadik) म्हणाले, ‘‘केंद्रीय योजनांसाठी प्रस्ताव पाठवले जात नाहीत. मी खासदार असताना जे प्रस्ताव पाठवले त्याचा पाठपुरावा केला जात नाही. कोरोना काळात सीपीआरमध्ये (cpr hospital)कोविड रुग्णालय असल्याने अन्य रुग्णांची आबाळ झाली. त्यामुळे मृत्यूही वाढले.’’

यावर अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना किती रुग्णालयांमध्ये कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांची व्यवस्था केली होती हे सांगता आले नाही. त्यामुळे चिडलेल्या डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या, ‘‘प्रधानमंत्री डायलेसिस सेंटर, गव्हर्न्मेंट कॅन्सर युनिट या योजनांसाठी तुम्ही प्रस्ताव पाठवत नाही. कोरोना काळात रुग्णांची हेळसांड होत होती. केंद्राकडून राज्याला ईसीआरपी योजनेचे पैसे आले. तुमच्यापर्यंत ते आले नाहीत तर त्याचा पाठपुरावा तुम्ही केला नाही. नुसती ही व्हिसी घेतली, ती घेतली असे सांगता. जर रुग्णांना सेवा मिळाली नाही तर तुम्ही घेतलेल्या व्हिसींचा उपयोग काय? आपण आरोग्य सेवेत काम करतो, हे लक्षात घ्या. कामात टाळाटाळ का करता? हलगर्जीपणा मी अजिबात सहनकरणार नाही.’’यावेळी सीपीआरचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे आणि जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

डॉक्टरांच्या बदल्यांबाबत खडाखडी

सीपीआर रुग्णालयातील जवळपास ४० हून अधिक डॉक्टर कोकणात पाठवले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील गंभीर, अती गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया थंडावल्या आहेत. परिणामी गरजू घटकांतील रुग्णांची परवड होत आहे, असा मुद्दा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘इथे गैरसोय होईल अशा बदल्या का, कशा केल्या? तसे आदेश कोणी दिले.’’ यावर अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांनी त्या डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रती नियुक्तीवर कोकणात पाठवले आहे. यात भूलतज्ज्ञांचाही समावेश असल्याने सीपीआरमध्ये काही शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याचे मान्य केले. तसेच सध्या येथील गैरसोय विचारात घेऊन चार नवे भूलतज्ज्ञ सीपीआरमध्ये नियुक्त केले आहेत. त्यामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू होत आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली; मात्र गेले अनेक दिवस येथील डॉक्टर कोकणात असल्याने व रुग्णसेवेवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याबद्दल डॉ. पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT