the winter season is dispatched
the winter season is dispatched 
कोल्हापूर

आला आला उन्हाळा....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव -  परिसरात उन्हाच्या तप्त झळा जाणवू लागल्या आहेत. विशेषत: दुपारी घराबाहेर पडणे अवघड बनत चालले आहे. थंडी गायब झाली असून, आता मेच्या अखेरपर्यंत तळपत्या उन्हाचा सामना करावा लागणार आहे. सध्या बेळगावचे कमाल तापमान आताच ३३ ते ३४ अंशांवर पोचले; तर किमान तापमान १८ ते १९ अंश आहे.

उन्हाच्या झळा वाढल्या; थंडी गायब

यंदाचे हवामान पाहता पावसाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू असल्यासारखे वातावरण आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता यंदा हिवाळा जाणवलाच नाही. हुडहुडी भरविणारी थंडी जाणवलीच नाही. दिवाळीनंतर सातत्याने निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे थंडीचा प्रभाव कमी होत गेला. एरवी महाशिवरात्रीनंतर ऊन वाढत जाते. मात्र, यंदा त्यापूर्वीच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे आता घरे, कार्यालये व अन्य ठिकाणी गारव्यासाठी पंख्यांची घरघर सुरु झाली आहे. शीतपेयगृह, रसवंतीगृह व शहाळे विक्रेत्यांचा व्यवसायही वाढतो आहे. तर चहा पिण्याकडचा कल कमी होऊ लागला आहे.

शहराच्या मुख्य बाजारपेठेबरोबरच अनेक प्रमुख मार्गावरून शहाळे विकेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. आकारमानानुसार शहाळे दर १५ ते ३० रुपयांपर्यंत आहे. अनेक प्रमुख मार्गांच्या दुतर्फा फिरत्या रसवंतीगृहाच्या गाड्याही वाढू लागल्या आहेत. या व्यवसायात स्थानिकांबरोबरच अनेक परप्रांतीय तरुणही सक्रिय झाले आहेत. उसाचा रस प्रति ग्लास १० ते ३० रुपये आहे. ज्यूस केंद्रांवरही गर्दी वाढू लागली आहे. फळांना मागणी वाढत असून दरातही वाढ सुरु झाली आहे. पुढील तीन महिने हा उन्हाळी मोसम विविध विक्रेत्यांना फायद्याचा 
ठरणार आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्यांचा वापरही वाढू लागल्याने टोपी विक्रेत्यांकडेही गर्दी वाढू लागली आहे.

यंदाचा उन्हाळा ठरणार कडक

गेल्या वर्षी पावसाळा लांबल्याने हिवाळाही लांबेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. पण, हिवाळ्याने दगा दिल्याने पारा चढतच आहे. सध्याचे तापमान पाहता यंदाचा उन्हाळा कडक ठरण्याचीच चिन्हे आहेत. मात्र, शेवटच्या टप्यापर्यंत पाऊस पडल्याने भूजल पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT