Snake sakal
कोल्हापूर

Kolhapur : दीड हजार सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू; हृदयद्रावक घटनेने हळहळ

एक ते दीडच्या दरम्यान प्रमोद यांना जाग आली असता लाईट लावल्यानंतर त्यांना अस्सल नाग अनिता यांच्या पायाशेजारी फणा काढून बसला असल्याचे दिसले.

सकाळ डिजिटल टीम

प्रमोद नागाला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनिता यांचा पाय लागल्याने नागाने दुसरा दंश केला, तरीही नागाला पकडून त्यांनी कुटुंबांसह अनिता यांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले.

हातकणंगले : सुमारे दीड हजारहून अधिक सापांना (Snake) जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल मध्यरात्री आळते (ता. हातकणंगले) येथे घडली. अनिता प्रमोद जनगोंडा (वय ३५) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत (Hatkanangale Police) झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आळते येथील अनिता व प्रमोद जनगोंडा यांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह (Love Marriage) केला आहे. प्रमोद एका उद्योग समूहामध्ये नोकरीस आहेत. परिसरात 'सर्पमित्र' म्हणून प्रमोदची ख्याती आहे.

त्याने आजवर दीड हजारांहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याचा सर्पदंशापासून बचाव कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवाय त्याने अनेकांना साप पकडण्याचे ट्रेनिंगही दिले आहे.

काल रात्री बाराच्या सुमारास दोघेही घरात झोपले होते. एक ते दीडच्या दरम्यान प्रमोद यांना जाग आली असता लाईट लावल्यानंतर त्यांना अस्सल नाग अनिता यांच्या पायाशेजारी फणा काढून बसला असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिले असता नागाने अनिता यांच्या एका पायावर दंश केल्याचे दिसून आले.

प्रमोद नागाला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनिता यांचा पाय लागल्याने नागाने दुसरा दंश केला, तरीही नागाला पकडून त्यांनी कुटुंबांसह अनिता यांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या उपचारांपूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेने आळते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनिता यांच्या मागे पती, मुलगा, परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT