Raja Shivchhatrapati Yuvak Mandal Kinaye esakal
कोल्हापूर

कन्नड संघटनांचा चिथावणीखोर इशारा; गावच्या फलकावरील 'महाराष्ट्र' शब्द गायब

मिलिंद देसाई

महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांना पाण्यात पाहणाऱ्या कन्नडीगांच्या डोळ्यात हा फलक खूपत होता.

बेळगाव : कन्नड संघटनांची (Kannada Association) कोल्हेकुई पुन्हा एकदा सुरू झाली असून किणये गावामध्ये एका फलकावर करण्यात आलेला महाराष्ट्राचा (Maharashtra) उल्लेख काढून टाकण्यासाठी कन्नडीगांनी पोलिसांवर (Karnataka Police) दबाव टाकला, त्यामुळं पोलिसांनी तो फलक हटविण्याची सूचना केल्यामुळं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गुरव गल्ली किणये येथील राजा शिवछत्रपती युवक मंडळानं (Raja Shivchhatrapati Yuvak Mandal Kinaye) काही दिवसांपूर्वी नवीन फलक उभारला होता, तसंच या फलकावर 'नजरेत हिंदू राष्ट्र हृदयात महाराष्ट्र' असा मजकूर लिहिला होता. मात्र, नेहमीच महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांना पाण्यात पाहणाऱ्या कन्नडीगांच्या डोळ्यात हा फलक खूपत होता. त्यामुळं या फलका विरोधात सोशल मीडियावरून काही कन्नडीगांनी चिथावणीखोर लिखाण लिहिण्यास सुरवात केली होती. तसंच हा फलक न काढल्यास गावात घुसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळं गावातील वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनी किणये ग्राम पंचायतीशी संपर्क साधून फलकाबद्दल माहिती घेतली होती. त्यानंतर गावात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये याची दखल घेत या फलकावरील महाराष्ट्र हटविण्यात आले आहे. कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी फलकावरील महाराष्ट्र हटविण्याची सूचना केल्या असल्या तरी मराठी भाषिकांच्या हृदयात असलेले महाराष्ट्र कसे हटविणार असा प्रयत्न कार्यकर्त्यातून विचारला जात आहे.

किणये आणि परिसर पूर्णपणे मराठी बहुल असून या भागात नेहमीच मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिलेले आहेत. त्यामुळंच कन्नड संघटनांकडून नकोते उचापती सुरू झाल्या आहेत. याची पोलिसांनी दखल घेऊन भाषिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी कन्नड संघटनांनी मराठी भाषेतील फलकांना टार्गेट केले होते, त्यामुळं काही ठिकाणी वादावादीचे प्रकार निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा कन्नड संघटनांचे कृत्य सुरू झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना समज देणे गरजेचे बनले आहे.

..अन्यथा कार्यकर्ते हिसका दाखवतील

तालुक्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी करू नये, तसेच पोलिसांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा कार्यकर्ते आपल्या पद्धतीने हिसका दाखवतील.

-संतोष मंडलिक, अध्यक्ष तालुका युवा आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT