Worship of Vada on vatpornima following the rules of social distance in kolhapur 
कोल्हापूर

चला ग सयानो फेऱ्या मारू वडाला, सोशल डिस्टन्स ठेवून घालवू कोरोनाला...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मास्क बांधून आज महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला. 'जन्मोजन्मी हाच पती लाभू दे' हे मागणे मागत महिला वडाची मनोभावे पुजा दरवर्षी करत होत्या. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे घरोघरी, गल्लीत वटपौर्णिमा साजरी झाली. एकाच वेळी गल्लीतील सर्वजणी मिळून वडाची पुजा करत होत्या. यावर्षी या सणाला हे चित्र बदलले. अवघ्या पाच - सहा जणींनी गल्लीत, टेरेसवर कुंडीत वडाच्या झाडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरी केली. काही जणींनी अंगणातील तुळशीलाच प्रतिक मानून पुजन केले.

कोरोनाचे संकट असले तरी महिलांचा उत्साह कमी झाला नाही. केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या, काठापदराची साडी, ठेवणीतील दागिने अशा पारंपरिक वेशभूषेत आज महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. "जन्मोजन्मी हाच पती मिळावा, पतीला दीर्घायुष्य मिळावे' अशी मनोकामना करत सावित्रींनी वटवृक्षाला फेऱ्या मारल्या. हिरव्या बांगड्या, विड्याचे पान, फळे आदी साहित्यांसह पूजा झाल्यानंतर महिलांनी एकमेंकीची ओटी भरली.
शहरातील वटेश्‍वर मंदिर, पोलिस लाईन, दत्त मंदिर, कोटितीर्थ, रेणुका मंदिर, ओढ्यावरचा गणपती मंदिर परिसरात या दिवशी असणारी गर्दी यंदा नव्हती. उपनगरातील वडाच्या झाडांच्या ठिकाणी महिलांनी सकाळपासूनच पुजन केले. वडाला धागा गुंडाळताना फोटोसेशनवरही काहींचा भर होता. पुजन झाल्यानंतर मैत्रिणींसोबत फोटोसेशन व सेल्फीही मोबाईलच्या कॅमेऱ्यात क्‍लिक झाल्या.

दरम्यान, पर्यावरण दिन व वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने पर्यावरणप्रेमींनी वडाच्या रोपांचे वाटप केले. शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला. महिला ग्रुपना ही रोपे दत्तक दिली. या रोपाचे पुजन करून महिलांनी ओसाड माळरानावर किंवा कॉलनीतील रिकाम्या जागेवर त्याची लागवड केली.

रामाचा पार यंदा सुनासुनाच...

दरवर्षी अंबाबाई मंदिरातील रामाचा पार वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी फुलुन जातो. वटपुजेसाठी महिलांच्या रांगा लागतात. येथे नवविवाहित महिलांसाठी विशेष पुजेची सोय असते. नवदांम्पत्य येथे सुखी संसारासाठी मनोकामना करतात. यंदा मात्र रामाचा पार सुनासुनाच राहिला.
 

काही दिवसापुर्वीच आम्ही वडाचे रोप आणले होते. कोरोनाचे संकट पाहता बाहेर जायचे नाही असे ठरवले होते. टेरेसवर कुंडीत हे रोप लावले. सजावट केली आणि पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
- रूपाली केळसकर, सुर्वेनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT