कुडची नगर परिषद
कुडची नगर परिषद  sakal
पश्चिम महाराष्ट्र

कुडची : नगराध्यक्षपदी दत्ता सन्नक्की बिनविरोध

एम. ए. रोहिले

रायबाग: कुडची नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी गुरूवारी (ता. ३) दत्ता सन्नक्की यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा माधुरी निडगुंदी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेवर ही निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून रायबागचे तहसीलदार रियाज बागवान यांनी काम पाहिले. यावेळी कुडची मतदार संघाचे आमदार पी. राजीव यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरूवारी (ता. ३) ही निवडणूक प्रक्रियाला प्रारंभ झाला. सकाळी १० ते १२ अर्ज भरणे, १२ ते १२.१५ छानणी, १२.३० पर्यंत माघारीचा कालावधी होता. या प्रक्रियेत केवळ दत्ता सन्नक्की यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी म्हणून रायबागचे तहसीलदार रियाज बागवान यांनी केली. यावेळी सन्नक्की यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

आमदार पी. राजीव म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन यापुढेही कुडची शहराचा विकास साधायचा आहे. आपण त्यासाठी नगरोत्थानमधून १० कोटीवर निधी आणला आहे. त्यातून प्रत्येक प्रभागातील आवश्यक ती कामे करून घ्यावीत.

नूतन नगराध्यक्ष दत्ता सन्नक्की म्हणाले, आमदार पी. राजीव व नगरसेवकांनी आपणावर विश्वास दाखविल्याने नगराध्यक्ष पदावर आपली निवड झाली आहे. त्यास पात्र राहून पक्षभेद न करता शहराचा विकास साधणार आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष बाशालाल रोहिले, नगरसेवक सादीक सजन, वासिक मारूफ, संजीव रडरट्टी, सादीक रोहिले, मोहन लोहार, शिवाप्पा घस्ती, साकीब पालेगार, मुख्याधिकारी उदयकुमार होनकांबळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. कुडची पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी सहकाऱयांसह बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Jayanta Patil: सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र... जयंत पाटलांचा मोठा खुलासा

IPL 2024 : पराभव विसरा, पुढच्या तयारीला लागा... कर्णधारने सहकाऱ्यांना दिला मोठा सल्ला

Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

Latest Marathi News Update: प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT