Last Result on objections 
पश्चिम महाराष्ट्र

हरकतींवर अखेर निकाल

दौलत झावरे

नगर ः आज निकाल लागेल, उद्या लागेल, असे म्हणत ज्याची प्रतीक्षा शिक्षकांकडून सुरू होती, ती आता संपली आहे. बदलीसंदर्भात दाखल केलेल्या 183 शिक्षकांच्या हरकतींवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना पुढील वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


जून महिन्यात झालेल्या शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत. काहींना ऑनलाइनवर भरलेल्या शाळांपैकी एकही शाळा मिळाली नाही. दुसरीकडे एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्या. या बदलीप्रक्रियेवर अनेकांनी हरकती नोंदविल्या. 

उशिराने सुनावणी 
बदलीनंतर सात दिवसांत हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घ्यावी, असा आदेश सरकारने बजावला होता. मात्र, तीन महिन्यांनंतर सुनावणी झाली. उशिरा सुनावणी झाल्याने निकाल लवकर जाहीर होईल, अशी अपेक्षा शिक्षकांची होती. मात्र, ती फोल ठरली. 

शिक्षकाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली 

शिक्षकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी होऊनही निकाल लागत नव्हता. शिक्षकांच्या या प्रश्‍नावर या संदर्भात "सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला. या संदर्भात "गुरुजींच्या बदल्यांसंदर्भातील हरकतींवर दोन दिवसांत निकाल', "न्यायासाठी गुरुजींची आयुक्तांकडे धाव', "फाइलचा मुक्काम हलला', "फाइलने गाठला अंतिम टप्पा' या मथळ्यांखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाला गतिमान करण्याची भूमिका "सकाळ'ने घेतली होती. पाठपुराव्यामुळे निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यामुळे शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. निकालामुळे पुढील हालचाली सुरू केल्या आहेत. 

निकाल पुढीलप्रमाणे ः 
एकूण दाखल हरकती ः 183,

शासन निर्णयानुसार समानीकरणांतर्गत निकाली ः 108

एनआय पुण्याकडे सादर ः 24

सुनावणीदरम्यान तक्रार नसल्याबाबत लेखी दिलेले अर्जदार ः 16

सुनावणीस गैरहजर ः 10,

आपसी बदलीबाबत अर्ज ः चार

निर्णयास्तव प्रलंबित ः दोन

गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अर्ज नसलेले ः दोन

चौकशीबाबत अर्ज ः पाच

निकाली ः दोन 

पदोन्नती झालेले ः एक

विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असलेले ः दोन 

शिक्षक सीईओंना भेटणार 
बदली संदर्भात दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन निकाल द्यायला उशीर करण्यात आला आहे. या संदर्भात शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास पाटील यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor Martyrs: देशासाठी प्राणार्पण... ऑपरेशन सिंदूरमधील 'त्या' सहा शूरवीरांची ओळख अखेर उघड

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीच्या 'नो-लुक' शॉटची चर्चा;नेट्समध्ये ठोकले तुफानी षटकार, BCCI ने शेअर केला VIDEO

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये बसस्थानकावर भरदिवसा चोरीचा प्रयत्न; दोन महिला रंगेहाथ पकडल्या

Rajapur Nuclear Power Project : 'आता प्रकल्पाला विरोध कराच, समोरून काय करतो ते बघाच..'; खासदार नारायण राणेंचा अणुऊर्जा प्रकल्पावरून विरोधकांना थेट दम

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

SCROLL FOR NEXT