पश्चिम महाराष्ट्र

भाजपकडून लिंगायत समाजाची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

सांगली - लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा तसेच अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत याबाबत भाजपकडून कोणतीच हालचाल झाली नाही. सरकारकडून समाजाची फसवणूक झाली आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार नसून समाजाने सद्‌सद्विवेक बुद्धीने मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नेते 
वसंतराव नगरकर आणि विश्वनाथ मिरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून आगामी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत काही वर्षांपासून मागणी केली होत आहे. समाजाला राजकीय आरक्षणासह आरक्षण हवे आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांत चळवळ तीव्र करण्यात आली. त्यासाठी आंदोलन केले. मात्र सरकारची अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे समाजाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरजकर म्हणाले, ‘‘राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघांचे निकाल बदलण्याची ताकद लिंगायत समाजामध्ये आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आरक्षण मिळेपर्यंत लढाई चालू ठेवली  जाईल. विधानसभा निवडणुकीपर्यंत धरणे, निदर्शने,  मोर्चा अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करू, अन्यथा समाजाची ताकद त्या निवडणुकीत दाखवून देण्यात येईल, असा इशाराही यावेळी मिरजकर यांनी दिला.’’ 

बैठकीस जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमनगौडा रवी- पाटील, डॉ. रवींद्र आरळी, प्रदीप वाले, नगरसेवक राजेंद्र कुंभार, मनोहर कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे नेतृत्व 
लिंगायत समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी जतमधील डॉ. रवींद्र आरळी यांच्याकडे समाजाचे नेतृत्व देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे. मात्र, स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात चालढकल केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, संपूर्ण समाज एकत्र करून समाजाची ताकद दाखवून देण्यात येईल, असेही डॉ. आरळी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT