खानापूर (बेळगाव) - नंदगडमधील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा फाशीस्थळाजवळील मारुतीने डोळे उघडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. परंतु, तज्ज्ञांनी हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे म्हटले असून, याला आळा घालण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत अफवांचे पेव फुटले असून, भाविकांना आकर्षित करण्यासाठी काहींनी हे प्रकरण उकरुन काढल्याचे म्हटले आहे. दरम्यान, श्रध्दाळूही मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत.
नंदगडमधील प्रकार अंधश्रद्धेचा
नंदगडमधील या मारुतीबाबत १५ ऑगस्ट २०१५ रोजी तत्कालीन पुजारी परशराम गुरव यांनीही असाच दावा केला होता. त्यावेळी या मूर्तीचे दोन्ही डोळे उघडल्याचे सांगून भाविकांना आकर्षित केले जात होते. मात्र, प्रशासनाने याबाबत संशोधन करविले होते. राणी चन्नम्मा विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. अमरेश यतगल यांनी सखोल अभ्यास करुन मारुतीने डोळे उघडल्याचा प्रकार खोटा असल्याचे सप्रमाण सिध्द केले होते. ते डोळे माणसाच्या डोळ्यांसारखे असले तरी ते उघडले यात तथ्य नाही. डोळ्यांना रासायनिक रंग लावल्याचे आढळते. हा रंग तेल-शेंदुरामुळे गायब होऊन डोळे उघडल्यासारखे वाटतात. नेत्रतज्ज्ञांकडून हे डोळे खरे नसल्याबद्दल शहानिशा करून घेतली आहे.
भाविकांना आकर्षितचा डाव
लोकांचे लक्ष विचलीत करण्याची ही युक्ती असून या अंधश्रध्देवर आळा घालायला हवा, असे त्यांनी २७ ऑगस्ट २०१५ रोजी सरकारला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. दोन दिवसांपासून मारुतीने डोळे उघडल्याचा दावा केला जात आहे. क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा विकास संघाचे अध्यक्ष शंकर सोनोळी यांनीसुद्धा ही घटना खरी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे, या ठिकाणी श्रध्दाळूंची गर्दी वाढू लागली आहे. पण, मारुतीने डोळे उघडल्याच्या घटनेबाबत प्रशासन व लोकांचे डोळे कधी उघडणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
मारुतीने डोळे उघडल्याची घटना ही अंधश्रध्दा असल्याचे सप्रमाण स्पष्ट झाले आहे. त्यानंतर श्रध्दाळूंची गर्दीदेखील कमी झाली होती. पुन्हा असा प्रकार घडल्याचा दावा करणे, ही श्रध्दाळूंना विचलीत करण्याची युक्ती आहे.
- बाहुबली हंदूर, इतिहास संशोधकया घटनेबाबत माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा पुरातत्व खात्याला याची माहिती देऊन चौकशी केली जाणार आहे.
- शिवानंद उळेगड्डी, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.