sadabhau khot comment on raju shetti baramati visit 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : ठरलं! सदाभाऊ आता थेट जुन्या भिडूलाच भिडणार; लोकसभेसाठी 'या' मतदारसंघातून आजमावणार ताकद

आता माझ्यासाठी हातकणंगले मतदारसंघातील सगळे पर्याय खुले आहेत,’ असे सदाभाऊंनी स्पष्ट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सदाभाऊ खोत घरच्या मैदानात आणि जुन्या भिडूविरोधात शड्डू ठोकण्याचा विचार करत आहेत.

सांगली : ‘हातकणंगले लोकसभा मतदार संघातून (Hatkanangale Loksabha Constituency) लढणार, हे शंभर टक्के नक्की आहे. माझ्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत,’ अशी भूमिका माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.

खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना आव्हान दिले आहे. ‘गेल्या हंगामातील उसाला ४०० रुपये अंतिम हप्ता आणि चालू हंगामातील उसाला ३५०० रुपये पहिली उचल मिळवून देण्यात राजू शेट्टी (Raju Shetti) यशस्वी झाले, तर लोकसभा लढण्याचा विचार सोडेन,’ असे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत श्री. खोत यांची भूमिका जाणून घेतली.

महायुती आणि विशेषतः भाजपसमवेत गेली काही वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर सदाभाऊंची कोंडी झाली आहे. त्यांच्या संघटनेला भाजपकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे या वेळी गरज पडली तर भाजपला अंगावर घेण्याची तयारी त्यांनी केली. ‘सन २०१९ च्या लोकसभेला धैर्यशील माने यांच्या विजयात सदाभाऊंचा महत्त्वाचा वाटा राहिला होता.

आता माझ्यासाठी हातकणंगले मतदारसंघातील सगळे पर्याय खुले आहेत,’ असे सदाभाऊंनी स्पष्ट केले आहे. हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मैदानात असतील. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली जाईल का? शिंदे गट नवा चेहरा शोधेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भाजपकडून माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल तयारी करत आहेत.

महाविकास आघाडीकडे या घडीला तरी सक्षम पर्याय दिसत नाही. प्रतीक जयंत पाटील यांना मैदानात उतरावयाचे ठरले तर नवे आव्हान उभे राहू शकते. अशा वेळी सदाभाऊंनी या मैदानात ताकद आजमावण्याचे ठरवले आहे. माढा लोकसभा मतदार संघातून सन २०१४ ला निसटता पराभव झालेले सदाभाऊ पुढे विधान परिषद आमदार, राज्यमंत्री झाले.

घरचे मैदान, जुना भिडू

सदाभाऊ खोत घरच्या मैदानात आणि जुन्या भिडूविरोधात शड्डू ठोकण्याचा विचार करत आहेत. आता हा भाजपला निव्वळ इशारा आहे की सदाभाऊंच्या शिडात खरंच हवा भरली आहे, याचा फैसला पुढील दोन-चार महिन्यांत होईल. इस्लामपुरातील भाजपशी त्यांचा सवतासुभा मांडलाय, हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT