lonand
lonand 
पश्चिम महाराष्ट्र

लोणंदमध्ये कचराडेरोप्रश्नी नगरपंचायतीवर धडक मोर्चा

रमेश धायगुडे

लोणंद - लोणंद नगरपंचायतीच्या वतीने 'घनकचरा व्यवस्थापन डेपो' गावच्या परिश्चमेकडे लोणंद औद्योगिक वसहाती नजीक गायरान जागेत उभारण्याच्या मासिक बैठकीत केलेल्या ठरावास विरोध करण्यात आला. तसेत हा प्रकल्प अन्य जागेत व्हावा, या मागणीसाठी प्रभाग एक व सात मधील नागरिकांसह शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हणमंत शेळके-पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून आज नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. 

शिरवळ रस्त्यावरील 'श्रीराम बझार' येथून मोर्चास प्रारंभ झाला. सावीत्रीबाई फुले चौक, स्टेशन चौक, शास्त्री चौक, गांधी चौक, तानाजी चौकातून मोर्चा नगरपंचायतीच्या पटांगणावर आला. यावेळी मोर्चा दरम्यान 'गाव आहे जनतेचे नाही कोणाच्या बापाचे 'आशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी नगरपंचायती समोर झालेल्या सभेत नगरसेवक हणमंत शेळके - पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके- पाटील, नगरसेवक अॅड.सुभाषराव घाडगे, एन.डी. क्षीरसागर, सुरेश शेळके, शिवसेना महिला आघाडीच्या अनिता माचवे, अमित शेळके, सागर शेळके आदींनी मनोगते व्यक्त केली. कचरा व्यवस्थापन प्रकल्याला आमचा विरोध नाही तर बहुमताच्या जोरावर पदाधिकारी यांच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराला विरोध आहे. हा प्रकल्प शासकीय निकशांनुसार अन्य जागेत व्हावा.अन्यथा या विरोधात या पेक्षाही तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा या सर्वांनी दिला.नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक शंकरराव शेळके यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले.

यावेळी मोर्चात गटनेते योगेश क्षीरसागर, नगरसेवीका दिपाली क्षीरसागर, कृष्णाबाई रासकर तसेच रविंद्र क्षीरसागर, भिकुदादा कुर्णे, गजेंद्र मुसळे महिला व नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT