Love Marriage to Cybercrime 
पश्चिम महाराष्ट्र

लव्ह मॅरेज ते सायबर क्राईम 

सूर्यकांत वरकड

नगर : जीवनसाथी वेबसाइटवर तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून जामखेड तालुक्‍यातील युवकाला एक लाख 65 हजारांना ठगविणाऱ्या एका तरुणाला सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. बनावट प्रोफाईल करणारी तरुणी नसून तो बेरोजगार तरुण होता, पोलिस तपासात समोर आले. 

निखिल नीलेश कदम (रा. दत्तू कदम चाळ, रायडोंगरी, बोरिवली ईस्ट, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, जामखेड तालुक्‍यातील सारोळे येथील हनुमान मोहन काळे यांना रेखा नीलेश कदम (रा. वाशी, मुंबई) असे नाव सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन जीवनसाथी या वेबसाइटवर व व्हॉट्‌सऍपवर वारंवार संपर्क केला. हनुमान काळे याने जीवनासाठी संकेतस्थळावरील रेखा कदम नावाच्या मुलीला मैत्रीची विनंती पाठविली. त्यानंतर तिने त्याला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार ऑललाईन पैसे मागवून घेतले.

हनुमान काळे तिचा पत्ता शोधीत मुंबईत गेला होता, पण शोध लागला नाही. लग्नाचे आमिष दाखवून एक लाख 65 हजार रुपयांना फसविले. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सायबर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मलिकार्जुन बनकर, राहुल गुंडू, अभिजित अरकल, विशाल अमृते यांच्या पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीचा छडा लावला.

गुन्ह्यातील वरील आरोपी निखिल नीलेश कदम हा असून, 
तो दत्तू कदम चाळ, रायडोंगरी, बोरिवली ईस्ट, मुंबई येथे राहत असल्याची माहिती समोर आली. सायबर पोलिस पथकाने मुंबई येथे निखिल कदम याच्या घरी छापा घालून ताब्यात घेतले. बनवाट अकाउंट तयार करून अन्य लोकांचीही आर्थिक फसवणूक केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला मोबाईल व फोटोशॉपबाबत चांगले ज्ञान असल्याने त्याने तरुणीची खोटी कागदपत्रे तयार केली. 

अनेकांना फसविल्याची शक्‍यता 
त्याला मोबाईल व तंत्रज्ञान चांगले अवगत असल्याने तो ज्या मुली जास्तीत जास्त फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात, अशा मुलींचे फोटो तो बनावट अकाउंटसाठी वापर होता. संबंधित व्यक्तीसाठी संपर्क करण्यासाठी तो वेगळा मोबाईल वापर होता. 

अनेकांना ठगविल्याची शक्‍यता 
आरोपी निखील कदम याने पुणे, मुंबई आणि राज्यातील विविध ठिकाणाच्या तरुणांना वेगवेगळ्या संकेतस्थळावरून बनावट प्रोफाईल तयार करून फसविले असण्याची शक्‍यता आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे.

- अरूण परदेशी, निरीक्षक सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT