Maharashtra Kesari National Champion hindkesari teacher Rammama life story sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

95 व्या वर्षातही तोच उत्साह ,अन् ध्यास घेत महाराष्ट्र केसरी, नॅशनल चॅम्पियन, हिंदकेसरी घडवतात राममामा

अजित कुलकर्णी

सांगली : ज्याचे मन, मनगट व मेंदू बळकट तोच खरा कर्तृत्ववान. याच विचारांची शिदोरी देत कुस्तीगीरांना घडवणारे वस्ताद राममामा नलवडे यांची कुस्ती प्रशिक्षण साधना 95 व्या वर्षातही त्याच उत्साहाने सुरु आहे. नित्य घडो आखाड्याचे सानिध्य हाच त्यांचा ध्यास आहे. महाराष्ट्र केसरी, नॅशनल चॅम्पियन, हिंदकेसरी घडवणारे राममामा सांगत आहेत जीवनरहस्य. 
 
तासगाव तालुक्‍यातीलं वायफळे त्यांचं गाव. चौथ्या वर्षी आई-वडिलाचं छत्र हरपलं. तिथून खडतर व प्रतिकुल परिस्थितीतून मी घडलो. आजोबा कडक शिस्तीचे. घरी गरीबी. बहीण व मी कोंड्यांचा मांडा करुन जगायचो. शिकारीच्या नादाने डोंगरमाळ पालथा घालायचो. अंगात रग व काटकपणा नैसर्गिक देणगी म्हणूनच आला. गावात दोन तालमी होत्या. पंचक्रोशीत जत्रा-यात्रातून कुस्त्या होत. फडक्‍यात भाकरी बांधून नेत असू. सन 1946 मध्ये नागाव कवठे, कवठेएकंद करत सांगलीत आलो. कायमचा सांगलीकर झालो. मावशीने आसरा दिल्यावर गजानन मिल तालमीत काही काळ सराव केला. जोर-बैठका दणकून काढायचो. सकाळची आंघोळ कृष्णेत, सायंकाळी झोपायला गणेश मंदिराच्या कट्ट्यावर तर व्यायाम सरकारी तालमीत. वसंतदादांनी मला मदतीचा हात दिला. 


तालमीतच माझा संसार होता. 40 व्या वर्षी लग्न झाले. तेव्हा स्थैर्य आलं. पहाटे सहाला व्यायामाने दिवस सुरु होतो. वयोमानाप्रमाणे हालचाली मंदावल्यात. नऊ वाजता रवा दुधात भिजवून नाष्ट्याला बदामयुक्‍त तुपाचा शिरा, अर्धा लीटर दूध घेतो. नंतर भेटीगाठी, पेपरवाचन होते. दुपारी 12.30 वाजता जेवणात वरण भात, चपाती, भाकरी, आमटी, फलाहार असतो. तिखट व तेलकट पदार्थ टाळतोच. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत विश्रांती घेतो. उठल्यावर सायंकाळी सहापर्यंत पुन्हा कुस्ती केंद्रात.

नव्या पिढीसोबत माझे आयुष्य आजही आनंदात जातेय. घरी आल्यावर बदाम, काजू, इलायचीयुक्‍त थंडाई तयार असते. रात्री नऊ वाजता जेवणात दूध असतेच असते. काही वर्षांपूर्वी मांसाहार बंद केला आहे. हॉटेलंच खाणं कधीच नाही. चहाचाही संबंध नाही. मैदानासाठी बाहेर जायचो तेंव्हाही घरातूनच बाजरीची भाकरी, गूळ, खर्डा, भाजलेले शेंगदाणे न्यायचो. आजही तेच. प्रसंगानुरुप लेखन, वाचनाने मन टवटवीत राहते. होतकरु पैलवानांना मदत आनंद देते. साधेपणा, सद्विचार, सद्‌भाव, परोपकार हेच जगण्याचे तत्वज्ञान. 

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: पडिक्कलची चार सामन्यात तिसरी सेंच्युरी; सर्फराज खान-ऋतुराज गायकवाडचीही वादळी शतके; टीम इंडियात कोणाला संधी?

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्स

Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ

मी चुकले! या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये... जितेंद्र जोशीच्या पत्नीने मागितली माफी; कारण...

SCROLL FOR NEXT