पश्चिम महाराष्ट्र

सांगली : भाजपचे सुधीर गाडगीळ विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

सांगली - येथील विधानसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा 6939 मतांनी पराभव केला. सुरुवातीस एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची ठरली आणि प्रत्येक फेरीत विजयाचे पारडे हलते रहात अखेर सुधीर गाडगीळ यांनी बाजी मारली. 

सुधीर गाडगीळ यांना पहिल्या फेरीत पिछाडीवर रहावे लागले होते. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज पाटील 284 मतांनी आघाडीवर होते. मात्र तिसऱ्या फेरीपासून त्यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. तिसऱ्या फेरीत अवघी तीन मतांची आघाडी त्यांना मिळाली. तर चौथ्या फेरीत त्यांनी 52 मतांची आघाडी घेतली होती. इतकी काट्याची लढत असल्याने सांगलीकरांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती. पाचव्या फेरीत गाडगीळ यांनी 703 मतांची आघाडी घेतली होती. मात्र सातव्या फेरीत ही आघाडी 363 पर्यंप खाली आल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा वाढल्या. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. 

आघाडीच्या हिंदोळ्यातच मतमोजणी पुढे सरकली नवव्या फेरीपासून आमदार गाडगीळ यांची आघाडी वाढत गेली आणि अखेर 6939 मतांनी त्यांनी निसटता विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीत आमदार गाडगीळ यांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. यंदा त्यांची आघाडी निम्म्याने खाली आली.

तेराव्या फेरीत आमदार गाडगीळ यांची आघाडी 9077 मतांपर्यंत गेल्याने त्यांचा विजय निश्‍चित वाटत होता. मात्र चौदाव्या फेरीत पुन्हा पृथ्वीराज पाटील यांनी मुसंडी मारल्याने गाडगीळ यांची आघाडी 6912 पर्यंत खाली आली. 

सांगलीत मतमोजणीवेळी तीन मशीनमध्ये बिघाड झाल्याने विरोधकांनी चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार केल्याने निकाल जाहीर करण्यास वेळ लागला. अखेर आमदार गाडगीळ दुसऱ्यांदा सांगली मतदार संघातून विजयी झाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

GT vs KKR Live Score IPL 2024 : पावसाचा जोर कामय, गुजरात - केकेआर सामन्यावर संकट

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT