महात्मा गांधींच्या सांगली भेटीस १०१ वर्षे
महात्मा गांधींच्या सांगली भेटीस १०१ वर्षे  sakal
पश्चिम महाराष्ट्र

महात्मा गांधींच्या सांगली भेटीस १०१ वर्षे

सकाळ वृत्तसेवा

सांगली : बरोबर १०१ वर्षांपूर्वी म्हणजे १२ नोव्हेंबर १९२० रोजी महात्मा गांधीजींनी सांगलीला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीची साक्ष देणारी कोनशिला येथील व्यापारी मोफत ज्ञान प्रसारक मंडळाच्या ग्रंथालयाच्या इमारतीची बसवण्यात आली. याच ग्रंथालयास शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारी १९२० रोजी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून इंग्रजांनी जाहीर केलेल्या लोकमान्य टिळकांनीही भेट दिली होती.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या दोन दिग्गजांनी एकाच वास्तूला भेट देण्याचे अनोखे उदाहरण असलेली वखारभागात ग्रंथालयाची इमारत आजही सांगलीतील वाचन चळवळीचे नेतृत्व करीत आहे.

वाचनालयाचे संचालक शरद शहा यांनी दिलेली माहिती अशी, सांगली व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने भाऊसाहेब तपकिरे यांच्या वाड्यात १९१६ च्या गणेशचतुर्थीस वाचनालयाची सुरवात झाली. नगरश्रेष्ठी शेठ रतनचंद साखळचंद यांच्या चाळीतील वाचनालयाच्या जागेत ३० सप्टेंबर १९१७ ला काकासाहेब आपटे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्‌घाटन झाले. यावेळी कृष्णाजी केशव बक्षी यांनी एक रुपयाची देणगी दिली आणि त्यांच्या गायनानेच समारंभाची सांगता झाली.

हा भाग तेव्हा शेत मालाची उतारपेठ होती. तेथे वर्तमानपत्रे वाचण्याची सोय म्हणून वाचनालय सुरू झाले. या काळात देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला उग्र स्वरूप येत होते. लोकमान्यांच्या निधनानंतर गांधीकडे स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व आले होते. त्या काळात गांधीजींचे सांगलीत आले असता निमित्त साधून व्यापारी मंडळींनी ही इमारत बांधण्याचे ठरवले. त्याची कोनशिला गांधीजींच्या हस्ते बसविण्याचा निर्णय झाला.’’

अनेकांच्या मदतीतून हा ग्रंथयज्ञ सुरू असल्याचे नमूद करून श्री. शहा म्हणाले, ‘‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी या वाचनालयास भेट दिली आणि रात्री त्यांच्या ‘नारिंगी निशाण’ या नाटकाच्या प्रयोगाची रक्कम वाचनालयाला दिली. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी नाटकाच्या एका प्रयोगाचे उत्पन्न आणि आर्याश्रित नाटक मंडळींनी खास खेळ करून ५३ रुपये साडेदहा आणे मदत दिली. सातारकर स्त्री संगीतनाटक मंडळींनी मदत दिली. शेठ रतनचंद साखळचंद, तसेच राजवाडे यांनी संस्थेस मदत केल्याचा उल्लेख आहे.

महात्मा गांधींचे हात या वास्तूला लागल्याने आज या सरस्वती मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ट्रस्टींनी गोपाळदास नारायणदास शहा यांच्या अध्यक्षतेखाली कामास सुरुवात केली. त्यानंतरच्या टप्प्यातील ‘गांधी भवन’ची पायाभरणी ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ विचारवंत वि. स. पागे यांच्या उपस्थितीत झाली. या इमारतीसाठी गांधी स्मारक निधी आणि मुख्यमंत्री निधीतून मदत दिली. सुमारे ४९ हजारांहून अधिक ग्रंथधनाच्या माध्यमातून वाचन चळवळीची अविरत सेवा सुरू आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT