पश्चिम महाराष्ट्र

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गारगोटीतील एकाला अटक

सकाळवृत्तसेवा

गारगोटी - बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून लोकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रथमेश प्रकाश चव्हाण (वय २२, जोतिबा चौक, गारगोटी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूलसह ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गारगोटी एसटी स्टॅंड परिसरात ही कारवाई केली.

लोकसभा निवडणूक व आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यावर कारवाईच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार व त्यांच्या पथकाला गारगोटी येथे प्रथमेश चव्हाण कमरेला पिस्तूल लावून फिरत असतो व लोकांना धाक दाखवत दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार आज एसटी स्टॅंड चौकालगत एका दुकानाच्या मोकळ्या जागेत छापा टाकून प्रथमेशला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल व ८०० रुपये किमतीचे चार जिवंत राउंड असा तीस हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ही पिस्तूल सराईत गुन्हेगार व मोकाअंतर्गत कारवाई झालेला गुंड योगेश बाळासाहेब राणे व त्याचा साथीदार विशाल बाजीराव पाटील यांनी दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी प्रथमेश चव्हाणला अटक करून त्याच्याकडे मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दादाराजे पवार, संदीप कुंभार, अमोल कोळेकर, नितीन चोथे, अर्जुन बंद्रे, राजेंद्र हांडे, पांडुरंग पाटील, प्रकाश संकपाळ, नेताजी डोंगरे, अनिल ढवळे, नामदेव यादव, विलास किरोळकर, सचिन पाटील आदींनी ही कारवाई केली.

योगेश राणेशी लिंक
प्रथमेश रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न धमकी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातूनच त्याची  काही वर्षांपूर्वी योगेश राणे व त्याच्या टोळीतील साथीदारांशी ओळख झाली होती. राणे टोळीवर मागील वर्षी मोकाअंतर्गत कारवाई झाली. या कारवाईची कुणकुण लागताच योगेश राणेने ऑगस्ट २०१८ ला पिस्तूल प्रथमेशकडे दिल्याची माहिती समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT