The meet shops in Belgaum city are closed at six pm daily belgum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात मिळणार सहापर्यंतच मटण ; पण कारण काय ?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव शहर आणि परिसरातील मटण दुकाने १ फेब्रुवारीपासून रोज सायंकाळी सहापर्यंतच सुरू राहणार आहेत. त्यामुळे यापुढे मटण खवय्यांना या वेळेत मटण दुकानांत जावे 
लागणार आहे.

असा झाला निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून बकऱ्याच्या दरात वाढ झाल्याने मटण विक्रेत्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच मटणाच्या दरावरूनही ग्राहक नाराज आहेत. सोमवारी कसाई गल्ली येथे मटण विक्रेता असोसिएशनची बैठक घेण्यात आली. यावेळी मटणाच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला.

मटणाचा दर असणार असा

त्यानुसार मटण प्रतिकिलो ५४०, तर काळीज व चरबी न घालता ६०० रुपये असा दर असणार आहे. दरात बदल करण्यात आलेला नाही. मात्र मटण दुकाने ६ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णयावर असोसिएशच्या बैठकीत एकमत झाले. नुकसान टाळण्यासाठी ६ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी रघू पलंगे, विलास जानवेकर, उदय घोडके, राजू कांबळे समीर सर्जेखान, गौस खाडे, प्रकाश महागावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT