Medical hubs provide local women with a great deal of employment in miraj marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

रुग्णांना हवा 'या' मावशींच्याच हातचा डबा...

विनोद शिंदे

मिरज (सांगली) - मेडिकल हब म्हणून मिरजेचा लौकिक सर्वदूर आहे. याच कारणामुळे देशभरातून औषधोपचारासाठी रुग्णांची येथे गर्दी नेहमीच पहायला मिळते. मेडिकल हब लैकिकामुळे स्थानिक महिलांना रोजगाराचा मोठा आधार मिळत आहे. रुग्णांना आजारपणात ताज्या, सुयोग्य आहाराची गरज असते. वाजवी दर, उत्तम दर्जामुळे बहुतांश रुग्णांसाठी घरगुती जेवणाचा डबा मागितला जातो.

घरगुती डब्याला पसंती

शहरातील रुग्णालयांत पश्‍चिम महाराष्ट्रासह, कर्नाटकातून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांची संख्या मोठी आहे. उपचारानिमित्त रुग्णालयात रुग्ण ॲडमिट होतात. त्यांच्याबरोबर राहण्यासाठी नातेवाईकदेखील मुक्कामी येतात. रुग्णांना हलका, ताजा आहार देण्यास डॉक्‍टरांकडून सांगितले जाते. बाहेरगावहून आल्याने असा आहार मिळणे. तयार करून देणे जिकीरीचे होते. त्याला पर्याय म्हणून घरगुती डब्याला पसंती मिळू लागली.

घरगुती जेवणाची रुग्णालयातून

शहरातील रुग्णालयांबाहेर संबंधितांचे संपर्क नंबर लिहिलेले असतात. बाहेर लावलेल्या चहाच्या टपरीवर डब्याची मागणी देण्याची सोय उपलब्ध असते. त्यातून कष्टकरी महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. महिलांनी हा व्यवसाय प्रामाणिकपणे केल्याने डब्यांबाबतची विश्वासार्हता वाढली आहे. रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांनादेखील डब्याचा मोठा आधार असतो. वैद्यकिय नगरीत हा डब्याचा व्यवसाय चांगलाच विस्तारत असल्याचे चित्र आहे. या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. त्यामुळेच डब्यांच्या मागणीत सातत्य पहायला मिळते. त्याचबरोबर शिक्षणानिमित्ताने येणारे विद्यार्थी, नोकरदारसुध्दा डबे मोठ्या संख्यने घेतात. मेस पध्दतीने देखील जेवणाची सोय काहींनी केली आहे. मेडिकल हबचा महिलांना रोजगारासाठी अशा प्रकारे चांगला उपयोग होऊ लागला आहे.

वार्षिक उलाढाल ४५ लाखांवर 

मिरज शहर परिसरात पस्तीस ते चाळीस कुटुंबे जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय करतात. सुमारे २५० ते ३०० डबे पुरवले जातात. किमान २ तर जास्तीत जास्त १५-२० डबे पुरवले जातात. त्याची उलाढाल रोज सुमारे १८ हजार रुपये तर एकूण उलाढाल सुमारे ४५ लाखांवर होते.

असा असतो रोजचा मेनू

नियमित जेवणात वरण- भात, भाजी, आमटी, तीन चपाती किंवा भाकरी, दही, पापड, लोणचे, रुग्णांसाठी मागणीनुसार वरण-भात, तूप, भात यासह अन्नपदार्थ असे मेनूचे स्वरूप असते. मागणीनुसार काही वेगळे पदार्थही उपलब्ध करून दिले जातात.

अठरा वर्षांपासून मी कुटुंबाच्या सहकार्याने घरगुती खानावळ चालवत आहे. रुग्णांना लागणारा आहार योग्य वेळी पोहचवण्यात येतो. रुग्णांना देण्यात येणारे आणि नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. रुग्णालय, शालेय विद्यार्थी व बाहेरगावहून आलेल्या नोकरदारांतून घरगुती जेवणाची मागणी वाढत आहे.
- माधुरी भोसले, घरगुती खानावळ चालक

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT