rahuri
rahuri 
पश्चिम महाराष्ट्र

मुनगंटीवारांनी केले मोहोळच्या शेतकऱ्यांचे कौतुक

राजकुमार शहा

मोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी दर्जेदार फळांचे व फळे उत्पादक शेतकऱ्यांचे  कौतुक केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे "मागोवा 2018" हे वार्षिक तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राने मोहोळ तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळांचा स्टॉल उभारला होता. या स्टॉलला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरू डॉ. के पी विश्वनाथा, संचालक डॉ. किरण काकाटे यांनी भेटी दिल्या. मंत्री  मुनगंटीवार यांनी मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ किरण जाधव व त्यांच्या सहकार्‍यांशी संवाद साधला, व स्टॉलमध्ये मांडलेल्या विविध दर्जेदार फळांची पाहणी केली. तसेच संबंधित फळाचे उत्पादन ,त्याचा उत्पादन खर्च,उत्पादन घेताना केलेला आधुनिक प्रयोग, पद्धत याची सविस्तर माहिती घेतली व सम्बंधित शेतकऱ्यांचे कौतुक केले.

राहुरी येथील प्रदर्शनात मोहोळ विज्ञान केंद्राने पापरी येथील खरबूज, आढेगाव येथील डाळिंब, खंडाळी येथील केळी तर हिवरे येथील बोरे अशी दर्जेदार उत्पादने ठेवली होती. मंत्री मुनगंटीवार यांच्याबरोबरच संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार प्रकाश गजभिये, डॉ बी आर पाटील, डॉ पंकजकुमार महाले, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, कुलसचिव डी डी पवार आदी मान्यवरांनीही भेटी देऊन या स्टॉल मधील दर्जेदार फळांचे उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांचेही कौतुक केले.
 तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळांच्या स्टॉल उभारणीसाठी मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे व विज्ञान केंद्राच्या सर्व अधिकाऱ्यांनी  परिश्रम घेतले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT