0crime_201_74.jpg
0crime_201_74.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः मिरजेतील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजेश मनोहर म्हेत्रे (वय 38, रा. वखारभाग, मिरज) यांनी कर्जास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. म्हेत्रे यांनी दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा काल मृत्यू झाला. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे. 

म्हेत्रे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्नीला व्हॉटस्‌अप मेसेज पाठवला होता. त्यामध्ये त्यांनी शेती पिकली नाही. मुलांचा शिक्षणाचा खर्च पेलत नसल्याने मी सोडून जात आहे, अशा मेसेज पाठवून विषारी द्रव्य प्रशान केले आहे. म्हेत्रे यांना दोन लहान मुले आहेत. त्यांनी दोन बॅंका व नातेवाईकांकडून पाच लाखांचे कर्ज घेतले होते. 

एक एकर द्राक्ष बाग वाया गेल्याने ते निराश झाले होते. बॅंकेकडून पीक कर्जाची दोन लाखांची कर्जमाफी मिळाली नव्हती. वसुलीसाठी तगादा लागल्याने नैराश्‍यातून त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती मिळाली. 

म्हेत्रे हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT