fit-india-ncc
fit-india-ncc sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : फिटनेसबाबत तरुणाई जागरूक

सकाळ वृत्तसेवा

मिरज: शारीरिक स्वास्थ्य वाढविण्यासाठी आणि आरोग्य उत्तम टिकविण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. शासनाच्या निर्बंधांमुळे जिम बंद होत्या. आता मात्र शासनाने सर्व निर्बंध शिथिल केले असून, जिम पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. १८ ते २५ आणि २६ ते ४० वयोगटातील तरुणाईची पाऊले पुन्हा जिमकडे वळली आहेत.

शहरातील अनेक जिम सकाळ सत्रात हाउसफुल्ल दिसत आहेत. काहींना सकाळी संधी मिळत नसल्याने त्यांनी सायंकाळी जीम जॉईन केली आहे. आजच्या आधुनिक युगात व्यायामाविषयीचे नववने तंत्रज्ञान तसेच गॅझेट बाजारात उपलब्ध आहेत, त्याचाही वापर तरुणाई करताना दिसत आहे. स्मार्ट फोनवरून माहिती घेत ॲप्सच्या मदतीनेही व्यायाम केला जात आहे. प्रत्येकाला पर्सनल ट्रेनर ठेवणे जमत नसल्याने तरुणाईकडून यू-टूबचा वापर सुरू आहे.

सध्या जिममध्ये छातीचे व्यायामाचे प्रकार, पायांचे व्यायाम प्रकार, पोटावरील चरबी कमी करण्याच्या टिप्स, नॅचरल रनिंग रॉम्प आदी साधनांचा वापर करून शरीरसृष्टी भक्कम केली जात आहे. सध्या ५०० रुपयांपासून दोन-तीन हजार रुपयांपर्यंत नवे तंत्रज्ञान असलेल्या जिम्सचे दर आहेत.

सध्याची तरुणाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी आग्रही आहे. यामुळे जिममध्ये कष्ट करण्याची तयारी तरुणाई करते आहे. शिवाय, शासकीय नोकरीतील आरक्षित क्रीडा प्रकारात ही स्पर्धा येत असल्याने नोकरीसाठी या स्पर्धेच्या प्रमाणपत्राचा नक्की उपयोग होतो.

- समीर जमादार, शरीरसौष्ठव स्पर्धक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT